फेसबुकवरुन बूक करा टॅक्सी

मुंबई: सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुक आता ट्रान्सपोर्ट क्षेत्रातही उतरलं आहे. उबर कॅब वापरणाऱ्यांच्या मदतीला आता फेसबुक धावून येणार आहे. लवकरच फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून उबर कार बुक करता येईल.

फेसबुकच्या ट्रान्सपोर्टेशन फील्डमध्ये उबर त्यांचं पहिलं भागीदार झालं आहे. फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून चॅटच्या साह्य्याने उबर कॅब बुक करता येणार आहे. तसेच यासाठी उबरचं अॅपही डाऊनलोड करण्याची गरज नाही.

उबरच्या माहितीनुसार, कालपासून ही सेवा अमेरिकेत सुरु झाली आहे. सध्या ही सेवा अमेरिकेत अशा जागी आहे जिथे उबर कॅबचे ऑपरेटर आहेत.

कसा कराल याचा वापर

या नव्या सेवेच्या माध्यामातून लेटेस्ट मॅसेंजर अॅपच्या मेन्यूमध्ये ट्रान्सपोर्टेशन ऑप्शन निवडून कॅब बूक करता येणार आहे. तसेच चॅटमध्ये कारच्या आयकॉनवर क्लिक करुन कॅब बूक करता येणार आहे.
 
फेसबुकने ही सर्विस आपल्या मेसेंजर अॅपलिकेशनला अधिक अॅक्टिव्ह करण्यासाठी सुरु केली आहे. मागील वर्षापासून फेसबूकने आपल्या मेसेंजर सर्विसला बूस्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. फेसबुकने आपल्या यूजर्ससाठी मेसेज सेंड आणि रिसिव्ह करण्यासाठी नव्याने मेसेंजर इन्स्टॉल करणं जरुरी केलं होतं.
 
यानंतर अॅपला आणखी हायटेक करण्यासाठी फेसबुकने यूजर्सला मेसेंजरच्या साह्य्याने पैसे काढण्यासाठी आणि पाठविण्यासाठी सर्विस देण्यात आली होती. आता उबर कॅबसोबत भागीदारी करीत फेसबूक यूजर्सला आणखी एक चांगली सेवा मिळणार आहे