आठ जोडप्यांच्या बांधल्या रेशीमगाठी
कोळी समाजातर्फे आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी झालेले नववधू-वर. पंढरपूर : आद्यकवी महर्षी वाल्मिकी संघातर्फे आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात आठ वधू-वरांच्या रेशीमगाठी बांधण्यात आल्या. यावेळी रक्तदान शिबीर, वधू-वरांचा पारणा व महर्षी वाल्मिकींच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ६ वा. गोरज मुहूर्तावर समाजबांधवांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कोळी महासंघाचे युवा अध्यक्ष चेतन पाटील होते. यावेळी वाद्यांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करत हर हर महादेव व वाल्मिकींचा जयघोष करत प्रदक्षिणामार्गे पारणा सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आली. विवाह सोहळ्यात वधू-वरांना हळदीची साडी, शालू, भांडी, मणीमंगळसूत्र, जोडवे, बिचवा, नवरदेवांना सफारी ड्रेस देण्यात आला. विवाह सोहळ्यानंतर उपस्थितांना मिष्टान्न भोजन दिले. वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी माजी आ. सुधाकरपंत परिचारक, आ. भारत भालके उपस्थित होते. यावेळी धनंजय कोताळकर, बाबा अधटराव, अरूण कोळी, विक्रम पापरकर, अनिल अभंगराव, सुरेश नेहतराव, श्रीकांत कोताळकर, रमेश पापरकर, संजय जाधव, भीमराव करकमकर, रमेश कोळी, धनंजय अधटराव, संदीप माने, आण्णा कोळी, शरद कोळी, रामभाऊ कोळी, दत्ताेपंत कांबळे, अनिता बळवंतराव, अंजना कोळी यांचा सत्कार केला.