पंढरपूर शहरात सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना प्रवेश बंदी
पंढरपूर Live वृत्त
पंढरपूर शहरामध्ये यापुढे सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत यावेळेत अवजड वाहनांना प्रवेश बंदी लागु केलेली आहे.
तरी येथील व्यापारी बंधूंना विनंती की आपली मालाची वाहने या वेळेत पंढरपूर शहरात येऊ देऊ नये.
एक सजग नागरिक म्हणून प्रत्येकांनी या शहरातील वाहतुक सुव्यवस्थे साठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शहर वाहतुक शाखेचे निरीक्षक श्री.गोपाळचावडीकर यांनी केले आहे.
पंढरपूर लाईव्ह शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
पंढरपूर शहरातील लिंक रोडवरील अवजड वाहतुक बंद करण्यात आलेली असून शहरातील वाहतुक नियंत्रीत होणेसाठी आमचे प्रयत्न चालु आहेत. अपघात टाळणेसाठी वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळणे आवश्यक असल्याचेही श्री.गोपाळचावडीकर म्हणाले. www.pandharpurlive.com