सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वाहतूक कोंडी

रायगड : सलगच्या चार सुट्ट्यांमुळे अनेक जण फिरण्यासाठी बाहेर पडल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहनांची गर्दी झाली आहे. खालापूर टोलनाक्यावर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे.

ईद, ख्रिसमस आणि शनिवार-रविवार या सुट्ट्यांमुळे अनेकांनी पर्यटनाचा बेत आखला. पण फिरण्याचा बाहेर पडलेले पर्यटक मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर अडकले आहेत.
खालापूर टोलनाका ते अमृतांजन पूल या घाट सेक्शन दरम्यान ही वाहतूक कोंडी झाली आहे. तर लोणावळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल 15 किमी अंतरापर्यंत वाहनांच्या तीन पदरी रांगा लागल्या आहेत.