प्रभावती मुडके यांचे निधन
पंढरपूर (प्रतिनिधी):-
येथील प्रभावती दत्तात्रय मुडके (91) रा. मनिषा नगर, पंढरपूर यांचे दि. 15-12-2015 रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. बार्शी येथील स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय मुडके यांच्या पत्नी व बाळासाहेब मुडके (तलाठी) यांच्या त्या मातोश्री होत. ‘प्रभावती काकु’ या नावाने मनिषा नगर परिसरामध्ये त्या सुपरिचित होत्या. अत्यंत मृदु स्वभावाच्या व धार्मिक प्रवृत्तीच्या प्रभावती काकूंच्या जाण्याने जुन्या काळाशी वर्तमान काळाची नाळ जोडणारा एक दुवा निखळला आहे.
त्यांचे पश्चात मुली मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.
येथील लिंगायत स्मशान भुमीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंढरपूरमधील अनेकजण उपस्थित होते.