शेती-समस्या व पर्यायी उपाययोजना

पंढरपूर लाईव्ह/महाराष्ट्र लाईव्ह न्युजबुधवार दि.9 डिसेंबर 2015लेखक- अविनाश म. कुटेपाटील (नेवासा)       (अ‍ॅटोकॅड इंजिनिअर) 

                शेतकरी शेती उत्पन्नासाठी एकरी 40ते50हजार रुपयांचे खते खरेदी करतो, 15 हजार रुपयांचे बियाने घेतो, शेतीच्या मशागतीसाठी 12 हजार रुपये खर्च करतो, मजुरांसाठी 20 हजार रुपये तयार ठेवतो. परंतु या सर्वासाठी लागणारे 8 हजार रुपयांची पाण्याची व्यवस्था तो करु शकत नाही. या साठी तो पाऊस तथा निर्सगावर अवलंबुन राहतो. पाऊस वेळेवर न पडल्याने नापिकी होते व त्याचे सर्व अर्थिक बजेट ढासाळुन जाते त्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतात. व या  सर्व रक्कमा त्याने हातउसणे, मित्र, खाजगीसावकार, बॅकांकडुन व्याजाने घेतलेल असतात. शाश्‍चवत पिक न अल्याणे तो कर्जाच्या विळख्यात जखडुन जातो. पुढे मुलांचे लग्न कार्य, बाळांतपण, दवाखाणा, शिक्षण, पाहुणचार या चक्रात आनखी अडकवुन आत्महातेस प्रवृत्त होतो. शेतकर्‍याचे हे असे विदारक चित्र पालटण्याच्या दृष्टीकोनातुन नेवासा बु. येथील श्री. मनोहरराव निळकंठ कुटे पाटील व त्यांच्या सौ. शशिकला ही वयौवृध्द जोडगोळी यांनी राळेगणसिध्दी, हिवरेबाजार या धरर्तीवर शेतकर्‍यांसाठी अतीअल्प 10 ते 20 गुंठ्ठे शेतीक्षेत्रावर एका कुटुंबाचा वर्षाचा उदरर्निवाह अगदी विनाकष्ट कमीत कमी खर्चात कसा भागेल यासाठी समाज व देशाच्या सर्वांगीन दृष्टीकोणातुन एक पायलट प्रोजेक्ट स्वयःस्फुर्ती, स्वःसंकल्पना व स्वखर्चातुन पुर्ण करण्यासाठी दोहो पतीपत्नीने गुंतवुन घेतलेआहे. 


10 ते 20 गुंठ्ठे शेती अतीअल्प क्षेत्रात केवळ 10 % पाण्यात, अतीअल्प नाममात्र खर्च, स्वकुटुंबाकडुन मशागत, विशमुक्त विनारासायनिक खताची व नैसर्गिक शेतीप्रोजेक्ट यशस्वी करण्यात ते मग्न आहेत, बोलण्या ऐवजी करण्यावर या वृध्दांचा भर असतो.अगामी काही दिवसातच त्यांचा हा पायलट प्रोजेक्ट आपणास पाहवयास मिळेल. खरी गरज आहे नवतरुणांन शेतीकडे लक्ष देण्याची अधुनिक, प्रगतशेतीची, कासधरण्याची कमीत कमी पाणी, कामीत कमी खर्च, मेहणत घेण्याची तयारी व भरगोस हमखास उत्पादन मिळेलच यासाठी नवतरुणांची भक्कम टीम तयार होण्याची गरज आहे. 

सोडुन द्या त्या राजकीय पायघड्या घालणे, गटा तटाचे राजकारण, गावगुंडी व विनाकारण तंट्टे मेाठं बांधुया आपण एकतेची-कृषीप्रधान देश समृध्द बनिविण्याची. शासनाने अल्प भुधारक, भुमिहिन, गरीब शेतकर्‍यांसाठी योजना राबविण्याची गरज आहे. ते प्रयत्नही करतात पण आपली उदाशीन प्रशासकीय व राजकीय व्यवस्था याचे नियोजन व प्रायोजन व्यवस्थीत अंमलबजावनी होत नाही. कर्जमाफी कर्जमाफी च्या नावाने टाहो फोडल्या जातो. पण ही कर्जमाफी कोणाला मिळतेहो... यात असतात मोठ मोठाले बागायतदार. 

आमच्या अल्पभुधारकास गरीब शेतकर्‍यास कुठलीही बॅक दारातसुधा उभी करत नाही हो... मग कसला शेतकरी बचाव व कसली कर्जमाफी सगळाघोटाळे बाजांचा बाजार हा गरीब शेतकरी हातउसणे व्याजाने पैसे घेतो व निर्सकोपाने नापिकी होऊन दृष्टचक्रात आडकतो खरी गरज आहे याला वाचविण्याची. नको आम्हाला कर्जमाफी, नको आम्हाला अमिशांची खैरात, आम्हाला हवे आहे फक्त उत्पादन खर्चावर निर्धारीत हमी भाव, नको आम्हाला सरकारी दुबळ्या कुबड्या, आम्ही आहोत सक्षम, मेहणत करण्यास तयार. आपणाकडे कृषी मंत्रालय, कृषीखाते, आयुक्त, सचिव, आय.ए.एस अधिकारी ते गावपातळीपर्यांत अनेक अधिकारीवर्गाची साखळी आहे. पण त्यांच्याकडे नियोजनबध्द कृती आराखड्याचा अभाव वाटतो. त्याकरीता हवा आहे गावपातळी पासुन प्रत्येक शेती गटवाईज कृषी लागवड, उत्पादन अराखडा. कुठल्यागावात-कुठल्या गटात कोणत पीक चांगले येते, त्यास हवामान, मोसम, पाणी, व्यवस्थापन यांचेसमांतर नियोजनबध्द अराखडा. या मंडळींनी गावकर्‍यासह समक्ष बसुन ठरवायला हवा.

एकाने कापुस लावला की सर्वच शेतकरी कापुस लावतात व मार्कट बाजारभाव कोसाळतात. म्हणुन गावपातळीपासुन ते संपुर्ण राज्यासह देशपातळी पर्यांत त्या त्या ऋतु प्रमाणे कोणकोणते पीक कोणत्या भागात चांगले येते याचे समांतर नियोजन बध्द कार्यक्रम प्रशासनाने तथा व्यवस्थापनाने तयार करुन तो कार्यक्रम  शेतकर्‍यांच्या सहकार्‍याने राबवयास हवा. म्हणेजे तेजी-मंदी येऊन भाव घसरणार नाही याचे कटीबध्द नियोजन शासनाकडुन गावकर्‍यांच्या सहभागातुन व्हायला हवे. तसेच शेतकर्‍यांच्या प्रत्येक पिकांच्या उत्पादनखर्चावर निर्धारीत हमी भाव ठरवायलवा हवा. शासनाचे प्रयत्न शासन जाना पण शेतकर्‍यांच्या मुलांनी आता जागृत व्होऊन शेती विकासाचा ध्यास घ्यायला हवा, एकरी उत्पादन वाढवयास हवे तरच शेती वाचेल, तरच भुमि व शेतकरी टिकेल. अल्पक्षेत्रात, अल्प पाण्यात, कमीत कमी नाममात्र खर्चात रसायन विरहित खत तथा नैसर्गीक शेती भरगोस उत्पादन कसे करावे हे आपण पुढील वेळोवेळीच्या भागात पाहणार आहोतच शेती व्याख्यान व संपर्कसाठी मो. नं. 9226428756.
                 

                     आपला
लेखक- अविनाश म. कुटेपाटील (नेवासा)
             (अ‍ॅटोकॅड इंजिनिअर)
मो.9226428756,     krve[atil02@gmail.bom