मानवी हक्क आयोगाचा बालगुन्हेगाराच्या वयाला विरोध!
नवी दिल्ली - बालगुन्हेगाराच्या वयात करण्यात आलेल्या सुधारणेला राष्ट्रीय मानवी हक्क अध्यक्ष न्यायाधीश के.जी. बालकृष्णन यांनी यास आपला विरोध असल्याचे सांगितले आहे.एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना बालकृष्णन म्हणाले, ‘आयोगाच्या पॅनलने सरकारकडे लेखी स्वरुपात आपला विरोध दर्शविला आहे. बालगुन्हेगाराच्या वयात बदल करणे हे संयुक्त राष्ट्राच्या बालहक्क कायद्याच्या विरुद्ध आहे. तसेच 16 वे वर्ष हे बालकाच्या जडणघडणीचे वर्ष असते. जर बालगुन्हेगाराला दोषी ठरवून कारावासाची शिक्षा दिली तर त्याच्यात सुधारणा होण्याची शक्यता उरणार नाही आणि तो पुढे मोठा गुन्हेगार होऊ शकतो. त्यामुळे आपण वय कमी करताना अधिक काळजी घ्यायला हवी‘
दिल्लीतील ‘निर्भया‘ प्रकरणातील एक आरोपी गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन होता. 18 वर्षांचा झाल्यावर त्याला आता सोडण्यात आलं आहे; त्यामुळं बालगुन्हेगार कायद्यात बदल करण्याची जोरदार मागणी देशभरातून करण्यात आली. यासंबंधीचं विधेयकही संसदेत नुकतच संमत झालं असून, बालगुन्हेगाराचं वय 18 वरून 16 वर आणण्यात आलं आहे.