स्वा.सै.कै.लिंगामहाराज कोरे संस्था करणार दुष्काळग्रस्तांना मदत पंढरपूर शहर व परिसरातील दानशुरांना पुढे येण्याचे आवाहन
पंढरपूर (प्रतिनिधी):- कै. लिंगामहाराज कोरे बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने गेली 12 वर्ष सामाजिक, धार्मिक, सांप्रदायीक, सांस्कृतीक कार्यक्रम त्यामध्ये खाऊ वाटप, रक्तदान शिबीर, भजन-किर्तन, रक्षाबंधन, अन्नदान आदी कार्यक्रम यशस्वीरित्या राबविले जातात. जर वर्षी 26 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय गायन व नृत्य स्पर्धेचे आयोजन करुन नवोदित कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव देवून त्यांना खुले व्यासपीठ उपलब्ध करुन दिले जाते. या वर्षी संपुर्ण राज्यात दुष्काळाच्या झळा असून शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. अशा वेळी कला-उत्सव कार्यक्रमावर खर्च करण्यापेक्षा या कार्यक्रमासाठी देणगी व जाहिरातीद्वारे मिळणारी रक्कम दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणूण दिली जाणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार कुमार कोरे यांनी विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली. 
पुढे बोलताना ते म्हणाले की, 1 जानेवारी 2016 ते 30 जानेवारी 2016 पर्यंत धान्य, जनावरासाठी चारा व आर्थिक निधी आदी विविध प्रकारची मदत जमा करणेसाठी मंडळाचे कार्यकर्ते स्वत: पंढरपूर शहर व परिसरात फिरणार आहेत. तरी नागरिकानी यथाशक्ती दुष्काळग्रस्तास मदत करावी असे आवाहन यानिमित्ताने केले असून पंढरपूर मर्चन्ट बँक येथील संस्थेचे खाते क्रमांक 122323 या अकाउंटवर सुध्दा आपला मदत निधी जमा करण्याची सोय केली आहे. तरी दानशुर लोकांनी येथे निधी जमा करावा. अधिक माहितीसाठी संगम न्युज पेपर स्टॉल, हॉटेल संजय जवळ, पंढरपूर गोरख भिलारे (मो.9423536326), राजा डिजीटल कलर लॅब, आयसीआयसीआय बँकेजवळ, पंढरपूर (मो.9921340700), न्यु राजा डिजीटल फोटो स्टुडिओ, शिवाजी चौक, पंढरपूर (मो.9422461365), सुर्या इलेक्ट्रीकल्स्, शिवाजी चौक पंढरपूर (मो.9423335939), शुभम कृषी सेवा केंद्र, विवेकानंद चौक (मो.99213405070), कजरी गिप्ट शॉपी, काळा मारुती जवळ, पंढरपूर (मो.9423587757) येथे संपर्क साधावा. प्रत्येक वर्षी या मंडळाचे वतीने नवोदित कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव देता यावा यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते मात्र या वर्षीची दुष्काळी परिस्थिती पहाता दुष्काळग्रस्तांना मदतीचा निर्णय केला आहे. तरी पंढरपूरकरांनी आमच्या या समाजाभिमुख उपक्रमाला जास्तीत जास्त मदत करुन आपली सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कुमार कोरे यांनी केले आहे.शेवटी सर्वांचे आभार आशिषकुमार लांडगे यांनी मानले.