मुंबईसह राज्याला हुडहुडी

मुंबई : मुंबईसह राज्यभरात पारा घसरला आहे. त्यामुळे बहुतेक जिल्ह्यात कडाडून थंडीने पडली आहे. घसरलेल्या पाऱ्यानं साऱ्या महाराष्ट्राला कडाडून सोडलं आहे.
 मुंबईत नीचांकी तापमानाचे रोज नव-नवे विक्रम होत आहेत. मुंबईत आजचा पारा 11.4 पर्यंत कोसळला आहे. काल मुंबईत 11.6 इतकं तापमान नोंदवण्यात आलं होतं.
 1949 सालानंतर मुंबईत दुसऱ्यांदा इतकी कडाक्याची थंडी पडली आहे.
 तिकडे निफाडमध्ये 5.6 इतकं विक्रमी तापमान घसरलं आहे. तर धुळ्यातही 7.8 तापमानाची नोंद झाली आहे.
 सोलापूरमध्ये मात्र थंडीचा जोर कमी आहे. सोलापूरमध्ये कालचं किमान तापमान 16.5 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय.
 राजधानी दिल्लीसह आख्खा उत्तर भारतातही कडाक्याची थंडी आहे. दिल्लीत सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात धुकं पडतंय. त्यामुळे काही अंतरावची वाहनं दिसणंही दुरापास्त झालं आहे.
 दिल्लीसोबतच वाराणसी, गोरखपूर, कानपूर अशा शहरात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.