हेडलाईन्स 6 डिसेंबर
भारताचा डाव 267 धावांवर घोषित, दक्षिण आफ्रिकेसमोर 481 धावांचं आव्हान
——————————–
छगन भुजबळ राज ठाकरेंच्या घरी भेटीला, अडीच तास खलबतं
——————————–
अकोला : राष्ट्रीय महामार्ग 6 वर मूर्तिजापुर तालुक्यातील कुरुम गावाजवळ दोन ट्रकचा अपघात, एका ट्रकचालकाचा मृत्यू
——————————–
नांदेड : खवा खाल्ल्याने मुदखेड शहरात 20 जणांना विषबाधा, 8 बालकांना नांदेडला हलवले
——————————–
पुणे आंतरराष्ट्रीय अर्ध मॅरेथॉन (महिला) : प्रथम – डोरकास किथोमे (केनिया), द्वितीय : रोहिणी राऊत (भारत), तृतीय : हेलेन मुस्योका (केनिया)
——————————–
पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन : इथिओपियाचा बालामामो आबादो प्रथम, मैयोस मैदी (केनिया) द्वितीय, मेकाश अल्मूल (इथियोपिया) तृतीय
——————————–
महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोंचा जनसागर चैत्यभूमीवर, प्रशासनाकडून तयारी पूर्ण, लोकलचा मेगाब्लॉक रद्द
——————————–
सोमवारपासून मंत्रिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरात सुरुवात, महागाई, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक मुद्दे गाजण्याची चिन्हं
——————————–
परमार आत्महत्येप्रकरणी नगरसेवक नजीब मुल्ला आणि विक्रांत चव्हाणांना 10 दिवसांची पोलीस कोठडी, तर हणमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाणांची प्रकृती बिघडली
——————————–
बाबरी मशिद पाडल्याच्या घटनेला आज 23 वर्ष पुर्ण, तर बाबरी मशीद पुन्हा उभी राहिल, एमआयएमच्या ओवेसींचं औरंगाबादेत धक्कादायक वक्तव्य
——————————–
महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांचा पाय खोलात, भुजबळांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील, किरीट सोमय्यांचा दावा
——————————–
साईप्रसाद ग्रूपच्या बाळासाहेब भापकरांना बेड्या, सेबीच्या तक्रारीनंतर कारवाई, महेश मोतेवारांच्या पासपोर्ट जप्तीचे आदेश
——————————–
आसामधील गुवाहाटीत दोन स्फोट, फॅन्सी बाजारातील स्फोटात दोघे जखमी, रस्त्याच्या कडेला बॅगेत ठेवलेले बॉम्ब
——————————–
कॅलिफोर्नियातल्या हल्ल्यामागे आयसिसची शक्यता बळावली, महिला हल्लेखोराकडून फेसबुकवर आयसिसच्या समर्थनाची पोस
——————————–
दिल्ली कसोटीवर टीम इंडियाची पकड आणखी घट्ट, कोहली आणि रहाणेच्या शतकी भागीदारीनं भारताला 403 धावांची आघाडी