महसूल मंत्री रंगले कीर्तनात...भाविकांना चांगल्या सुविधा देण्यास शासन प्रयत्नशील-महसूल मंत्री एकनाथ खडसे
पंढरपूर-दि. 21:- महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी बाबा महाराज सातारकर यांच्या मठाला सदिच्छा भेट देवून तेथे सुरु असलेल्या कीर्तनाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे उपस्थित होते. पंढरपूर येथे येणार्या वारकर्यांची संख्या अधिक आहे. येथे येणार्या सर्व भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केले.

महसूल मंत्री खडसे म्हणाले की, पंढरपुरात येणार्या वारकर्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंढरपूर शहरावर वाढणारा ताण कमी करण्यास 65 एकर जागा विकसीत करण्याचा मंत्रीमंडळाने निर्णय घेतला आहे. ही जागा विकसीत करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी यांनी प्रयत्न करुन या ठिकाणी चांगली व्यवस्था निर्माण केली आहे. या ठिकाणी काही अडचणी असल्यास त्या दुर करण्याचा नजिकच्या काळात प्रयत्न केला जाणार असून वारकर्यांना जास्तीत जास्त सुविधा निर्माण करुन दिल्या जातील. महसूल मंत्री म्हणाले, पंढरपूरात येणारा वारकरी हा चंद्रभागेचे स्नान व विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरात येतो. वारकर्यांना चंद्रभागेत व्यवस्थित स्नान करता यावे यासाठी नदीवर घाट बांधण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. पंढरपूरच्या विकासासाठी 560 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.
65 एकर येथे शासन व प्रशासनामार्फत उत्तम सुविधा देण्यात आल्या असून या ठिकाणी सुलभ शौचालय, स्वच्छ पाणी याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. नजिकच्या काळात या ठिकाणी प्रती वाळवंट निर्माण करण्याचा मानस असून विजेची बचत करण्यासाठी ङएऊ (एल.ई.डी.) बल्बचा वापर करण्याचे नियोजन आहे. यासाठी विद्युत वितरण कंपनी व नगरपालीकेने प्रस्ताव सादर करावा
तत्पूर्वी महसूल मंत्री खडसे यांनी 65 एकर येथील आपत्ती निवारण केंद्रास भेट दिली आणि वारकर्यांसाठी केलेल्या सुविधेचा आढावा घेतला. तसेच वारक-यांसाठी आणखी सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या.