भावी पिढीवर वारकरी संप्रदायाचे संस्कारासाठी वारकरी शाळा- महसूल मंत्री एकनाथ खडसे

 पंढरपूर-दि. 21:- वारकरी संप्रदाय हा संस्कार देणारा, संस्कृती जपणारा संप्रदाय आहे. हे संस्कार जपणारे वारकरी भावी पिढीत निर्माण व्हात यासाठी राज्यात वारकरी शाळा  सुरु करुन त्यांना शासनामार्फत मदत देण्याचा विचार असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. येथील वै. ह.भ.प. झेंडुजी बुवा बेळीकर यांच्या मठात आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री खडसे बोलत होते. यावेळी मठाचे अध्यक्ष रमाकांत भारंबे यांच्यासह मठाचे विश्वस्त उपस्थित होते.

                 महसूल मंत्री म्हणाले, वारकरी संप्रदायास मोठी परंपरा आहे. भागवत धर्माची पताका घेऊन वारकरी पंढरीची वाट चालत आहे. पंढरीत येणार्‍या वारकर्‍यांची उत्तम सोय झाली पाहिजे. त्यांना आवश्यक सोयी, सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी शासनामार्फत आवश्यक ते प्रयत्न सुरु आहेत. पंढरीत येणार्‍या पालख्या, दिंड्या यांना पालखी मार्गावर त्यांची स्थळे नजिकच्या काळात निश्चित करुन देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.

                          झेंडुजी बुवा मठाच्या बांधकामाचे काम दर्जेदार व्हावे यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे असे आवाहन महसूल मंत्री खडसे यांनी केले. यावेळी त्यांच्या हस्ते मठाच्या बांधकामासाठी काढण्यात आलेल्या देणगी आवाहन पुस्तीकेचे अनावरण करण्यात आले.
00000