कार्तिकी एकादशीनिमित्त बाबा ग्रुपच्या वतीने फलहाराचे वाटप

पंढरपूर दि. 22 नोव्हेंबर 2015
फोटो -कर्तिकी एकादशी निमित्त भाविकांना फलाहाराचे वाटप करताना बाबा ग्रुपचे सर्व सदस्य.  
पंढरीसी जारे आल्याने संसारा हा संत तुकाराम महाराजांचा अंभग प्रमाण माणून पंढीत येणार्‍या लाखो भाविकांची सेवा करण्याची संधी मिळणे हे परमभाग्य असून याच हेतूने पंढरीत एकादशी निमित्त बाबा ग्रुपच्या वतीने फलाहाराचे वाटप करण्यात आले.
            पंढरीतील स्टेट बँक लक्ष्मी रोड येथे बाबा ग्रुपच्या वतीने हा सामाजिक उफक्रम राबविण्यात आला.यावेळी बाबा ग्रुपचे संस्थापक उत्तम चव्हाण,सुभाष हाके,भारत कबाडे,हर्षल जगताप,राहुल धोत्रे,भैय्या अंभगराव,अंकुश घाडगे,सचिन कबाडे यांच्यासह बाबा ग्रुपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित  होते.