दुष्काळग्रस्त जनतेच्या मागण्यांसाठी मानवाधिकार संघटनेचे ना.खडसेंना निवेदन *टँकरसह चारा छावणी सुरु करण्याची मागणी*

पंढरपूर दि. 2 नोव्हेंबर 2015

फोटो :- दुष्काळग्रस्त जनतेच्या विविध मागण्यांसाठी महसुलमंत्री एकनाथ खडसे यांना निवेदन देताना मानवाधिकार संघटनचे  प्रदेश संघटक दौलतराव उंबरे,सोलापूर जिल्हाध्यक्ष गंगाधर कोळी,सोलापूर महासचिव दशरथ मोरे,जिल्हाध्यक्ष सौ.माधवी कोळी,महिला महासचिव सारिका शेळके,वरिष्ठ उपाध्यक्षा कु.लक्ष्मी वाघमारे,पंढरपूर शहराध्यक्ष दिप पवार यावेळी आमदार भारतनाना भालके हे सुध्दा उपस्थित होते.

                    राज्यातील जनता भिषण दुष्काळात होरपळून निघत असून सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील परिस्थीती अतिशय भयानक आहे.अशा परिस्थीतीत शासनाने जनतेला मदतीचा हात देणे गरजेचे आहे.पाणी पुरवठ्यासाठी मागेल त्या गावास टँकर व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करावेत तसेच  पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनी धरणात पाणी सोडण्यात यावे,सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा आदी मागण्यांचे निवेदन मानवाधिकार संघटनच्या वतीने महसुलमंत्री ना.एकनाथ खडसे यंाना  देण्यात आले. यावेळी आमदार भारतनाना भालके हे सुध्दा उपस्थित होते.

                   सद्या महाराष्ट्रातील ग्रामिण जनता अतिशय बिकट प्रसंगाला तोंड देत आहे.एकीकडे निसर्गाची अवकृपा तर दुसरीकडे उदरनिर्वाहाची व कर्जपरतफेडीची चिंता यामुळे राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे अशा वेळी शासनाने वेळीच शेतकर्‍यांना व ग्रामिण जनतेला मदतीचा हात दिल्यास त्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.तरी याबाबत शासनाने त्वरीत निर्णय घ्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
       राज्यात अर्थिक ताणतणाव व वाढत्या शहरीकरणामुळे कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात वाढ होत आहे.तर अनेक ठिकाणी 498 च्या खोट्या केसेस करुन अनेक सुखी कुटुंबांना उध्वस्त केले जात आहे.तरी शासनाने कौटुबिक न्यायलयात सुरु असलेले खटले त्वरीत निकाली काढण्यासाठी उपाययोजना करावी अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.