महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांचा सोलापूर जिल्हा दौरा
सोलापूर दि. 20 - महसूल, पुनर्वसन व मदत कार्य,भूकंप पुनर्वसन,अल्पसंख्याक विकास आणि वक्फ, कृषी आणि फलोत्पादन,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, राज्य उत्पादन शुल्क मंत्री एकनाथराव खडसे हे महाराष्ट्र राज्य हे सोलापूर जिल्हा दौ-यावर येत आहेत. त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे –
शनिवार दि.21 नोव्हेंबर 2015 रोजी दुपारी 4 वाजता मुक्ताई नगर जि.जळगांव येथून खाजगी हेलिकॉप्टरने पंढरपूर येथील हेलिपॅडवर आगमन. सायं. शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे मुक्काम.
रविवार दि.22 नोव्हेंबर 2015 रोजी पहाटे 02.20 ते 03.00 वाजता कार्तिक एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी शासकीय महापुजेस उपस्थिती (स्थळ – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर) शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे राखीव. सकाळी 11 वाजता पंढरपूर येथील हेलिपॅडवरुन हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे प्रयाण करतील.