कार्तिक वारीनिमित्त पंढरपूर येथे लोकराज्य स्टॉल

कार्तिक वारीनिमित्त

पंढरपूर येथे लोकराज्य स्टॉल

 

 

पंढरपूर-दि. 21:-  शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचा स्टॉल कार्तिक वारीत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पंढरपूर येथे स्टेशन रोडवर  लावण्यात आला आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रत्येक महिन्यात लोकराज्य मासिक प्रकाशित करण्यात येत असून यामध्ये शासन सामान्य जनतेसाठी राबवित असलेल्या निर्णयाची आणि विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे.  पंढरपूर येथे कर्तिकी वारीसाठी आलेल्या वारकरी व भाविकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी आणि हा अंक जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी लोकराज्य स्टॉल लावण्यात आला आहे. 

या स्टॉलवर  जलयुक्त शिवार, मेक इन महाराष्ट्र, संत तुकाराम महाराज  आदि विविध विशेषांक  ठेवण्यात आले आहेत.  स्टॉलवर लोकराज्य मासिकाचे वार्षिक वर्गणीदार  केले जात असून  वारकरी, भाविकांनी लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

000000