छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील मराठी लेकी सुरक्षित नाहीत.... कर्तव्य सोडून पावित्र्यावर शंका घेणार्या पोलिस अधिकार्यांच्या बेजबाबदाराची बळी ठरली एक निरागस मुलगी... आत्महत्या करण्यापूर्वी श्रुतीचे पत्र.... ‘आई मला माफ कर....!’’’
पंढरपूर लाईव्ह वृत्त
औरंगाबाद : तू ‘तशीच’ आहेस, म्हणून तो मुलगा तुझ्या मागे लागतो. बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशा वागता, कोणतेही पुरावे नसताना, असा जीवघेणा आरोप करण्याचं धाडस दुसर्या तिसर्या कोणाचे नाही, तर औरंगाबादच्या खटावकर नावाच्या पोलिस उपनिरीक्षकाचे आहेत. कर्तव्य सोडून मुलीच्या पावित्र्यावरच शंका घेणाचं डेअरिंग खटावकराने केलं आहे. खटावकराची ही भूमिका आणि नालायक स्वप्नील मणियारकडून होणारी छेडछाड यामुळे तरूण श्रुतीने जीव सोडला.... यवरुन हे सिध्द होते की, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील लेकी आज सुरक्षित नाहीत..... ही लाजिरवाणी गोष्ट आहे..! एका बेजबाबदार आणि विकृत पोलिस अधिकार्याच्या निष्क्रीयेतेची बळी ठरलेल्या श्रुतीने अखेर आपला जिवनप्रवास संपवला... शेवटच शब्द तिचे काळजाचा थरकाप उडविणारे... ‘आई मला माफ कर..!’’
याबाबतचे़ सविस्तर वृत्त असे की, स्वप्नील मणियार सातत्याने छेडतो, अशी तक्रार घेऊन श्रुती कुलकर्णी पोलिस स्टेशनमध्ये गेली होती. मात्र तिथेच पाषाणहृदयी पोलिस अधिकारी खटावकराची आणि श्रुतीच भेट झाली. इथेच श्रुतीच्या इज्जतीच्या अक्षरश: चिंधड्या झाल्या.... खटावकरांनी श्रुतीची छेडछाड केली नाही, मात्र त्यांनी श्रुतीला ज्या मर्दुमकीने वागणूक दिली, ती छेडछाडीपेक्षाही भयानक होती. खटावकरांनी श्रुतीला, ‘‘ तू तशीच आहेस, बाप नाही म्हणून तुम्ही मुली अशाच वागता...’’ असं म्हणत तिच्या पावित्र्यावरच शंका घेतल्याचं, श्रुतीची बहीण सांगते. खटावकराने आपली मर्दूमकी नराधम स्वप्नीलवर दाखवली असती, तर कदाचित आज श्रुती वाचली असती. पण त्याने जे शब्द वापरले, ते ऐकून कोणत्याही मुलीने विष प्राशन केलं नसतं तर नवल..
त्यामुळे श्रुतीच्या आत्महत्येला जेवढा स्वप्नील मणियार जबाबदार आहे, तेवढाच जबाबादार पोलिस उपनिरीक्षक खटावकर नाही का? असा प्रश्न आता श्रुतीचे नातेवाईक विचारत आहे. मग पोलिसांवरच आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल का होऊ नये, असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
बघा... आत्महत्येपूर्वी श्रुतीने लिहिलेलं पत्र... काळजाला हात घालणारं.... हे पत्र... एका निष्पाप जिवानं आपली जिवनयात्रा संपविण्याापूर्वी आपलं जीणं कसं मुश्किल झालं ते स्वत:च्या जन्मदात्रीला कथण करणारं....
आई मला माफ कर..
सॉरी, पण तुला आणि सगळ्यांना माझ्या चुकीमुळं खूप त्रास झाला. पण आता माझ्या चुकीची शिक्षा तुम्हाला नाही.मला असं करायचं नव्हतं. पण त्या स्वप्नीलनं माझ्याकडे ऑप्शन ठेवला नाही.
दीदीलाही फोन करुन त्रास देऊ लागला.
उद्या काय करेल माहित नाही.
मला तुझं नाव मोठं करायचं होतं, पण नाही करु शकले. त्यासाठी माफ कर
श्रुतीच्या घरची परिस्थिती तशी हलाखीचीच...
सिडकोच्या एन सिक्स भागात श्रुती बहीण आणि आजीसह राहायची. आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यामुळं घरात कर्त-सवरतं कुणी नव्हतं. त्यामुळंच परिसरात राहणार्या स्वप्नील मणियारनं श्रुतीला त्रास द्यायला सुरुवात केली. याला वैतागून श्रुती पोलिसांत गेली होती. मात्र तिथे खटावकर पोलिसांनी तिलाच आरोपीच्या पिंजर्यात उभं केलं.
श्रुतीने अन्यायाविरुध्द लढा दिला मात्र... जुजबी कारवाईनंतर नालायक स्वप्नीलला सोडलं...
श्रुतीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी स्वप्नीलला ताब्यात घेतलं. जुजबी कारवाई केली. तो बाहेर आला, आणि त्याने श्रुतीचं जगणं मुश्कील केलं. ताण सहन झाला नाही, अखेर झोपेच्या गोळ्या घेऊन ती कायमची शांत झाली.
श्रुतीच्या आत्महत्येला पोलिसही जबाबदार?
निर्भया, शक्ती मिल प्रकरणानंतर महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारनं हेल्पलाईन सुरु केली. पोलिसांना तातडीनं कारवाईचे आदेश दिले. मात्र त्याची अंमलबजावणी नीट झाली असती तर आज श्रुतीवर आयुष्य संपवण्याची वेळ आली नसती. त्यामुळं अक्षम्य हलगर्जीपणा करणारे पोलीसही श्रुतीच्या आत्महत्येला तितकेच जबाबदार आहेत.
ज्या महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांनी अशा प्रकारे गैरकृत्य करणार्यांचे हात-पाय तोडल्याची शिक्षा केली.... अशा या पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेमुळे संपुर्ण मराठी माणुस हळहळल्याशिवाय रहाणार नाही.... कायद्याचे रक्षकच जर असे बेजबाबदारपणाणे वागत असतील तर सर्वसामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा करावी तर कोणाकडे? हा प्रश्न सतावत आहे.....

