पंढरपुरातील पत्रकार आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचे पत्रकार पुरस्कार जाहीर
पंढरपूर :- पंढरपुरातील पत्रकार आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेचा स्व . पांडुरंग (तात्या )घळसासी स्मृती जेष्ठ पत्रकार पुरस्कार आणि स्व. अमित ओव्हाळ स्मृती युवा प्रतिभा पत्रकार पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून लवकरच पंढरपूर येथे भव्य कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत .
स्व . पांडुरंग (तात्या )घळसासी स्मृती जेष्ठ पत्रकार पुरस्कारासाठी दैनिक पुढारीचे सोलापूर न्यूज ब्युरो चीफ श्रीकांत साबळे आणि दैनिक सकाळ सोलापूरचे पत्रकार विजयकुमार सोनावणे यांना विभागून जाहीर झाला आहे तर स्व. अमित ओव्हाळ युवा प्रतिभा पत्रकार पुरस्कार मोहोळ ग्रामीण चे दैनिक तरुण भारत चे वार्ताहर सम्मेद शहा आणि मंगळवेढा दैनिक पुढारीचे पत्रकार समाधान फुगारे यांना विभागून देण्यात येणार आहे .
या पुरस्कारचे हे दुसरे वर्ष असून वरील दोन्ही पुरस्कारांसाठी जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात आले होते . अनेक जेष्ठ आणि युवा आपले प्रस्ताव पाठविले होते . पत्रकारितेतील तज्ञ समितीने प्राप्त प्रस्तावाची छाननी करून वर्ष भरात वेगवेगळ्या विषयांची मांडणी करून पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या प्रस्तावांची निवड केली असल्याची माहिती संयोजक पत्रकार सुनील उंबरे व पत्रकार अभिराज उबाळे यांनी दिली .