गुरुवारी पंढरपुरात सोलापूर जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष मेळाव्याचे आयोजन जिल्हा कक्षप्रमुख डॉ.बी.पी.रोंगे यांची माहिती

 पंढरपूर– सोलापूर जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने येत्या गुरुवारी दि २७ ऑगस्ट२०१५ रोजी सकाळी साडेअकरा वाजता पंढरपुरातील टिळक स्मारक मंदिरामध्ये सोलापूर जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षातील पदाधिकाऱ्यांसाठी मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती सोलापूर जिल्हा शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा कक्षप्रमुख डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
        या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सरचिटणीस अॅड. अरुण जगताप हे प्रमुख मार्गदर्शन व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच या मेळाव्यात शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत कलुबर्मे, सोलापूर जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बरडे, शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे सोलापूर विभागप्रमुख रमेश चव्हाण शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव,उप जिल्हाप्रमुख महावीर देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख संभाजीराजे शिंदे, शहर प्रमुख संदीप केंदळे, कक्ष उपजिल्हाप्रमुख डॉ. कैलास गोरे, ज्ञानेश्वर जाधव, महादेव बंडगर , माळशिरस तालुका कक्षप्रमुख उमेश जाधव, माढा तालुका कक्षप्रमुख अशोक चोपडे,मंगळवेढा तालुका कक्षप्रमुख नारायण गोवे, शहरप्रमुख शांताराम यादव,वैभव झुंजुर्डे,सांगोला शहर कक्षप्रमुख संतोष बनसोडे हे देखील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तरी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाशी निगडीत असणाऱ्या सोलापूर जिल्हातील सर्व पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे.असे आवाहन शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा कक्षप्रमुख डॉ. बी.पी.रोंगे यांनी केले आहे.