हायप्रोफाईल हत्याकांड : बहिणीच्या हत्येसाठी इंद्राणी मुखर्जीला अटक ..... कोण आहे इंद्राणी मुखर्जी ...? हायप्रोफाईल हत्याकांड : ’एच आर’ ते सीईओ पदापर्यंतचा इंद्राणीचा प्रवास....... शीना ही बहिण नाही तर मुलगी होती; इंद्राणीची धक्कादायक कबुली.... सविस्तर व विस्तृत वृत्त फक्त पंढरपूर लाईव्ह वर...
हायप्रोफाईल हत्याकांड : बहिणीच्या हत्येसाठी इंद्राणी मुखर्जीला अटक
मुंबई : स्टार इंडियाचे माजी सीईओ पीटर मुखर्जी यांची पत्नी इंद्राणी मुखर्जी हिला मुंबई पोलिसांनी अटक केलीय. तीन वर्षांपूर्वी आपल्या बहिणीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा आरोप इंद्राणीवर आहे.कोण आहे इंद्राणी मुखर्जी
INX मीडिया आणि INX न्यूजच्या माजी सीईओ
इंद्राणीनं २००२ पीटर मुखर्जी यांच्याशी लग्न केलं
हे पीटर यांचं दुसरं लग्न होतं
२००० मध्ये इंद्राणी आणि पीटर यांनी आयएनएक्स मीडिया सोडलं
इंद्राणी हिची सख्खी बहिण शीना बोरा हिचा २०१२ साली खून झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिना हिचा मृतदेह मुंबईपासून ८४ किलोमीटर दूर रायगड जिल्ह्यातील एका जंगलात पुरला होता.
शिनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तिला अटक केलीय. याप्रकरणी इंद्राणीला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय.

इंद्राणी मुखर्जी यांच्या ड्रायव्हरला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यानं आपलं तोंड उघडलं... आणि या खुनाबद्दल काही धक्कादायक खुलासे केले. या प्रकरणात इंद्राणीचाही सहभाग असल्याचं त्यानं म्हटलंय. तसंच शिनाचा मृतदेह कुठे पुरला ती जागाही त्यानं पोलिसांना दाखवलीय.
हायप्रोफाईल हत्याकांड : 'एच आर' ते सीईओ पदापर्यंतचा इंद्राणीचा प्रवास......
इंद्राणी - मिखाईल इंद्राणीचीच मुलं...
'टेलिग्राफ'नं दिलेल्या बातमीनुसार, इंद्राणीच्या नातेवाईकांनीही शीना ही इंद्राणीची मुलगी असल्याचं सांगितलंय. इतकचं नाही तर, इंद्राणीला शीनासोबत आणखी एक मुलगाही - मिखाईल आहे. 'आपला बराच वेळ कोलकाता आणि त्रिपुरामध्ये व्यतीत करणाऱ्या व्यक्तीसोबत असलेल्या संबंधातून' इंद्राणीला हे दोन अपत्य आहेत. त्यानंतर, इंद्राणीनं अनेकदा कोलकाता आणि जमशेदपूरमध्ये दौरा करणाऱ्या पीटर मुखर्जी यांच्यासोबत विवाह केला.इंद्राणीनं शीनाची बहिण म्हणून करून दिली ओळख
शीना आणि तिचा भाऊ इंद्राणीच्या आई-वडिलांकडेच गुवाहाटीमध्ये लहानाचे मोठे झाले. शीनाचा भाऊ सध्या एका एअरलाईनमध्ये कामाला आहे. शीना आणि तिचा भाऊ जेव्हा मुंबईला शिक्षणासाठी दाखल झाले तेव्हा इंद्राणीनं शीनाची ओळख आपली बहिण म्हणून करून दिली. शीना ही त्यावेळी इंद्राणी आणि पीटरच्याच घरी राहत होती.शीनाचे पीटर यांच्या मुलासोबत संबंध
'फर्स्टपोस्ट'नं दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणीची बहिण म्हणून मुखर्जी यांच्या घरात दाखल झालेल्या शीनाचे पीटर यांच्या मुलासोबत (पहिल्या लग्नापासून झालेला मुलगा) संबंध जुळले होते.शीना ही बहिण नाही तर मुलगी होती; इंद्राणीची धक्कादायक कबुली
मुंबई : पोलिसांनी इंद्राणी मुखर्जी हिची चौकशी केल्यानंतर शीखा वोरा हत्या प्रकरणाला आता वेगळंच वळण मिळालंय. शीना ही इंद्राणीची बहिण नसून तिची मुलगी असल्याचं धक्कादायक सत्य या तपासात पुढे आलंय.शीना हिनं मुंबईच्या सेंट झेव्हियर्स महाविद्यालयातून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. २०१२ मध्ये जेव्हा शीना मुंबईतून अचानक गायब झाली त्यावेळी ती २४ वर्षांची होती आणि रिलायन्स ADAG कंपनीत कामाला होती.
++++++++++++++++++++++++++

जगाच्या कानाकोपर्यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अॅन्ड्रॉईड अॅपचे 2.0 हे न्यु लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!
Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/ apps/details?id= pandharpurlive.com
********







