जि.प. प्रा.शाळा मुंढेवाडी येथे डिजीटल कक्षाचे उद्घाटन

पंढरपूर दि. 14/7/2015

पंढरपूर तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा मुंढेवाडी येथे डिजीटल कक्षाचे उद्घाटन

गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुलभा वठारे यांचे हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक रामचंद्र मोरे हे होते. कार्यक्रमासाठी  यशवंत पतसंस्थेचे चेअरमन नारायणदादा मोरे यांनी 25,500/- रु. किमंतीचा एलसीडी प्रोजेक्टर भेट दिला. कार्यक्रमासाठी विस्तार अधिकारी पोप लवटे केंद्र प्रमुख रा.मा. चव्हाण, सुदाम मोरे, अभिमान मोरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष समाधान मोरे, सचिन मोरे, शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.उषा पाटील,


सरपंच बाई कृष्णदेव राऊत, उपसरपंच अरुण घाडगे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या वेळी शालेय परिसरामध्ये वृक्षारोप करण्यात आले. बदलुन गेलेले शिक्षक सुरेश ढोले व नविन आलेल्या शिक्षीका लतीका घोडके, जिल्हा सोसायटीचे नुतन संचालक उत्तम जमदाडे, श्री.दादाराजे  देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पदविधर शिक्षक कल्याणराव शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सुधीर सवणे, संगीता तांबोळकर, सुमन जमदाडे, शिवाजी गोरे, सु.ल.धोत्रे, औदुंबर कांबळे, सुनिता शिलवंत यांनी परिश्रम घेेतले ._____________________________________

+++++++++++++++++++++++++

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com

    

____________________________________