श्री विठ्ठल अभियांत्रिकीच्या 3 विद्यार्थ्यांंंची ब्रिजस्टोन कंपनीत कॅम्पस इंटरव्यूहद्वारे निवड!

पंढरपूर:-श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित गोपाळपूर अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील 3 विद्यार्थ्यांची ब्रिजस्टोन या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीत कॅम्पस इंटरव्यूहद्वारे निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

       प्ाुणे येथील ब्रिजस्टोन या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेकॅनिक क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणार्‍या या कंपनीचे एच. आर. काशिराम मिस्त्री, दिपीका जैन, रेणू थॉमस व त्यांच्या निवड समितीने घेतलेल्या

इंटरव्यूहमध्ये गोपाळपूर येथील श्री विठ्ठल इंजिनिअरिंग कॉलेजमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांंंच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची शिस्त, आदरयुक्त संबंध व उत्कृष्ट शिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील राहूल दस्तूरकर,सागर गायकवाड व नागनाथ भ्ाूसनर या 3 विद्यार्थ्यांंची कंपनीकरिता निवड केली. सदर विद्यार्थ्यांंना ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डॉ.माधव राऊळ, प्रा.प्रकाश बनसोडे व प्रा.सी.सी.पतंगे या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले असून संस्थेचे अध्यक्ष धनंजय


सालविठ्ठल, उपाध्यक्ष एन.एस. कागदे, संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे, ज्येष्ठ विश्‍वस्त दादासाहेब रोंगे, विश्‍वस्त एच.एम.बागल, विश्‍वस्त बी. डी.रोंगे, डॉ. रोंगे यांच्या व्यवस्थापनातील सदस्य, वसतिगृह व्यवस्थापक प्रा.एम.एम.पवार, रजिस्ट्रार राजेद्र झरकर, सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांंचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांंच्या निवडीमुळे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विशेषत:पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
छायाचित्र:- ब्रिजस्टोन या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीत कॅम्पस इंटरव्यूहद्वारे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील 3 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली यावेळी कंपनी विषयी माहीती देताना कंपनीच्या एच. आर. दिपीका जैन सोबत डावीकडून काशिराम मिस्त्री व आदी.

+++++++++++++++++++++++++

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com

    

____________________________________