पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी पंढरीत पत्रकारांचा मोर्चा.. पंढरपूरच्या तहसिलदारांना दिले निवेदन...पंढरपूर पत्रकार संघ, श्रमीक पत्रकार संघ आणि पुरोगामी पत्रकार संघातील सर्व पत्रकारांचा आंदोलनात सहभाग... टाळ-मृदंगाच्या निनादात शिवतिर्थ ते तहसिल कार्यालयापर्यंत पार पडलेल्या मोर्चाने सार्यांचे लक्ष वेधले... याबाबतचे सविस्तर व्हिडीओ वृत्तांकन ‘पंढरपूर लाईव्ह’ वर...
पंढरपूर लाईव्ह वृत्त: दि.13 जुलै 2015
पत्रकार संरक्षण कायदा करावा या मागणीसाठी पंढरीत सर्व पत्रकार संघटनांनी मोर्चा आणि घंटानाद आंदोलन केले. तहसीलदार गजानन गुरव यांंना निवेदन देऊन आंदोलन संपवणेत आले. राज्यभरात पत्रकारांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षांपासून पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी होत आहे. मात्र राज्य सरकार कायदा करण्या संदर्भात ठोस निर्णय घेण्याऐवजी चाल-ढकल करीतआहे. त्यामुळे राज्यातील विविध 16 पत्रकार संघटनांनी आज सोमवार दि.13 जुलै 2015 रोजी राज्यभरात घंटानाद आंदोलन छेडले. या आंदोलनात सहभागी होत श्रमीक पत्रकार संघ, पंढरपूर पत्रकार संघ, पुरोगामी पत्रकार संघ या सर्व या संघटनेच्या सर्व पत्रकारांनी एकत्रीत येवुन मोर्चा आणि घंटानाद आंदोलन केले.
यासंदर्भातील व्हिडीओ क्लिप बघा....
यावेळी जेष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, अभय जोशी, सुनिल उंबरे, संजय वाईकर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष नवनाथपोरे, विनायक हरिदास, दत्तात्रय खटवटे, शिवाजी शिंदे, अनिरुद्ध बडवे, प्रशांत आराध्ये, सचिन झाडे, पुरोगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष अभिराज उबाळे, सुनिल दिवाण, अतुल बडवे, महेश खिस्ते, सत्यविजय मोहोळकर, आदी उपस्थित होते. पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे, भगवान वानखेडे, राजाभाऊ शहापूरकर, श्रीकांत कसबे, संजय कोकरे, दिनेश खंडेलवाल, संतोष कुलकर्णी, रामचंद्र ननवरे, विकास पवार, विजय काळे, नितीन शिंदे, बजरंग नागणे, भारत नागणे, सतीश बागल, गणेश क्षीरसागर, माऊली डांगे, संकेत कुलकर्णी, गणेश कोले, महालींग दुधाळे, महेश कदम, विठ्ठल कवडे, धनाजी वाघमोडे, सचिन कांबळे, शरद कारटकर, दत्ता गुरव, गौतम जाधव, नंदकुमार देशपांडे
+++++++++++++++++++++++++
जगाच्या कानाकोपर्यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अॅन्ड्रॉईड अॅपचे 2.0 हे न्यु लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!
Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/ apps/details?id= pandharpurlive.com
____________________________________









