पुणे संभाजी ब्रिगेडला अज्ञातांकडून स्फोटक पदार्थांचं पार्सल, पुण्यामध्ये तक्रार दाखल
पंढरपूर लाईव्ह वृत्त:- दि. 8 जुलै 2015
पुणे : संभाजी ब्रिगेडला काही अज्ञात व्यक्तींनी स्फोटक पदार्थांचं पार्सल पाठवल्याचं उघडकीस
आलं आहे. पुण्याच्या जिजाऊ
प्रकाशनच्या पत्त्यावर काही जिलेटीनची पाकिटं आणि आक्षेपार्ह मजकूर असलेली
काही वृत्तपत्रांची कात्रणं पाठवली गेल्याची तक्रार संभाजी ब्रिगेडचे
प्रदेश संघटक अजय भोसले यांनी केली आहे.
स्फोटक पदार्थांचं पार्सल आणि आक्षेपार्ह
मजकूर असलेली वृत्तपत्रातील कात्रणं पाठवल्यासंदर्भात पुण्याच्या फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात आली आहे. वृत्तपत्रांच्या कात्रणात काही व्यक्तींच्या नावांवर फुल्या मारल्याचंही आढळून आलं आहे.
संबंधित पार्सल पुण्यातील सदाशिव पेठेतून पाठवण्यात आल्याचा शिक्का त्या पाकिटावर आहे. दरम्यान हा प्रकार खोडसाळपणातून घडला आहे की यामागे आणखी काही कारणं आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.
+++++++++++++++++++++++++
जगाच्या कानाकोपर्यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अॅन्ड्रॉईड अॅपचे 2.0 हे न्यु लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!
Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/ apps/details?id= pandharpurlive.com
____________________________________









