एक्सप्लोलर 2015’ हे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणारे एक विद्यापीठ - संचालक डॉ. पी.जे कुलकर्णी.....श्री. विठ्ठल अभियात्रिकीत एक्सप्लोरर 2015’ नियतकालीकेचे प्रकाशन

पंढरपूर:- श्री. विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इंन्स्टिटयुट संचलित अभियांत्रिकी

महाविद्यालयात वार्षिक नियतकालीका एक्सप्लोरर 2015’ चे प्रकाशन वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज सांगलीचे संचालक डॉ. पी.जे कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. संचालक डॉ. कुलकर्णी म्हणाले, या नियतकालीकेमध्ये सुंदर, उद्बोधक, विधायक, सांस्कृतिक, ललित व अनुभवातून आलेले लेखन व रचनात्मक कवितांचा समावेश आहे. हे नियतकालीका पाहून मला देखील महाविद्यालयीन जीवनाची आठवण आली. हे एक्सप्लोरर 2015’ म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ आहे. अशा नियतकालीकांमुळे विद्यार्थ्यांचे अंर्तमन कागदावर उमटते. आणि त्यातूनच पुढे लेखक, कवी, सशोधक व कलाकार घडत असतात.विद्यार्थी आपले निरिक्षण कल्पना शक्ती, कलाकौशल्य याचा उपयोग करुनच अशा पध्दतीचे शब्द, कलाशिल्प निर्माण करु शकतात.’ असे सांगून या नियतकालीकेमधील कथा, कविता चित्रे, आदींचे त्यांनी मुक्त कठांने कौतुक केले. प्रा. यशपाल खेडकर संपादित विद्यार्थ्यांसाठी असणार्‍या नियतकालीकामध्ये उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.एन.मालदार यांच्यासह आदी मान्यवरांच्या शुभेच्छा असून विविध विभागाच्या विद्यार्थ्यांनी विविध लेखन केले असून वाचताना मन प्रफुल्लीत होते.’ असे म्हणाले. 

संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे म्हणाले की, वेळापत्रकातून वेळ काढून विद्यार्थ्यांनी आपले विचार, कथा, कविता, चित्र आदी माध्यमातून पुस्तकात उमटविल्या.’ या लेख, कविता व आदी साहित्यांचे प्राचार्य डॉ. रोंगे यांनी स्वागत केले. यावेळी काँम्प्युटर अ‍ॅण्ड सायन्स इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख प्रा. पी.ए. सातारकर, इलेक्ट्रानिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंचे विभाग प्रमुख जे.ए. केंदुळे, प्रा. ए.पी. नरवाडकर, प्रा.यषपाल खेडकर, अधिष्ठाता डॉ.एस.एम.मुकणे, सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, डॉ. श्रीदेवी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉ. पी.एस.कचरे, अधिष्ठाता प्रा. एस.आर. गवळी, प्रा. एम.आय.बोहरी व आदी प्राध्यापक उपस्थित होते.
    
उदयाचे समिक्षक घडावेत यासाठी समिक्षा’ हा लेखन विभाग या नियतकालीकाच्या अंर्तभुत असून विद्यार्थ्यांनी चित्रपट, पुस्तक, सामाजिक स्थिती याचे यथायोग्य समिक्षण केले आहे.तर साईटेक’ या विभागात विज्ञान व तंत्रज्ञानाबद्दल विद्यार्थ्यांनी नवीन ज्ञान देणारे लेख लिहले आहेत.
छायाचित्र:- श्री. विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इंन्स्टिटयुट संचलित वार्षिक नियतकालीका एक्सप्लोरर 2015’चे प्रकाशन वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज सांगलीचे संचालक डॉ. पी.जे कुलकर्णी,यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोबत प्रा. सातारकर, प्रा.केंदुळे, प्रा. नरवाडकर, प्रा खेडकर, अधिष्ठाता डॉ .मुकणे, सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, डॉ. श्रीदेवी, डॉ. कचरे, प्रा. गवळी, प्रा. बोहरी व आदी.
+++++++++++++++++++++++++

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com

    

____________________________________