पावसाळी अधिवेशनात सत्ताधार्‍यांनी केली पत्रकारांची मुस्कटदाबी... मिडीयाच्या प्रतिनिधींना प्रवेशद्वारावरच थोपवले....

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-दि.15 जुलै 2015

पावसाळी अधिवेशनात सत्ताधार्‍यांनी मिडीयाच्या प्रतिनिधींना प्रवेशद्वारातच अडवले. विरोधकांच्या आंदोलनाचे वार्तांकन करु नका म्हणत पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार केला आहे. पावसाळी अधिवेशनात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने फडणवीस सरकारविरोधात मोर्चा उघडल्यामुळे चांगलाच गोंधळ उडालाय. पण, आज अधिवेशनात मीडियाची मुस्कटदाबीचा प्रयत्न झाला. विरोधकांच्या आंदोलनाचं कव्हरेज करू नये म्हणून मीडियाच्या प्रतिनिथींनी विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच अडवण्यात आलं. ही बाब लक्षात येताच विरोधकांना एकच हल्लाबोल केला.


आंदोलनाचं कव्हरेज करू नये यासाठी मीडियाला प्रवेश नाकारला या विरोधात विरोधक संतप्त झालेत. सुरक्षा कर्मचारी आणि विरोधक आमदार यांच्यात बाचाबाचीही झाली. विरोधकांनी माध्यमांची बाजू लावून धरल्यानंतरच सुरक्षारक्षकांनी आंदोलनाच्या चित्रीकरणास परवानगी दिली. पण, यानिमित्ताने सरकारचा हा एक प्रकारचा दडपशाहीचाच प्रकार असल्याचं दिसतंय.

____________________




जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com

    

____________________________________