पंढरपूर शहरातील मनमाडकर मठासमोर आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह.. मयताचे गुप्तांग गायब.. कमरेखालील भाग छिन्नविछिन्न अवस्थेत

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- पंढरपूरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गयाबाई मनमाडकर मठासमोर एका अज्ञात इसमाचा मृतदेह आज दुपारी 1 वा  आढळुन आला. सदर मृतदेहाचे गुप्तांग गायब झालेले  होते. कमरेखालील भागच छिन्नविछिन्न झालेला होता. मृताचे वय अंदाजे 50 वर्षे, ऊंची 165 सेमी, वर्ण गोरा, बांधा सडपातळ, केस काळे पांढरे, अंगात काळे रंगाचा फुल बाह्याचा शर्ट, करडया रंगाची पॅन्ट होती. या घटनेबाबत किशोर सिताराम जाधव रा.भक्ती मार्ग, पंढरपूर यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाणेत आज दि . 17 जुलै 2015 रोजी 1 वा खबर दिली. 1:30 वा या घटनेबाबत बेवारस मृतदेह आढळला अशी नोंद पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात झालेली असुन पुढील तपास एपीआय गाडे हे करत आहेत. अशी माहिती पोलिस सुत्रांकडुन समजली आहे.

पंढरपूर शहरात ऐन आषाढी यात्रेच्या तोंडावर स्टेशन रोडवरून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी हा छिन्नविछिन्न अवस्थेतील  मृतदेह आढळुन आल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. सदर मृतदेहाचे गुप्तांग गायब असलेने हा प्रकार मृत्यु की हत्या? याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे.