बॉक्स ऑफीस वर बाहुबली सुपर हीट.... पाच दिवसातच 200 कोटी क्लबमध्ये पोहोचला...
पंढरपूर लाईव्ह वृत्त:-दि.15 जुलै 2015
‘बाहुबली’
हा चित्रपट प्रदर्शित होऊन अवघे कांही दिवस झाले नाहीत तोवरच या
चित्रपटाने बॉक्स् ऑफिसवर तुफान कमाई केलेली आहे. अवश्या पाच दिवसातच या
चित्रपटाने 200 कोटींचा गल्ला जमा केला आहे.एस. एस राजामौली दिग्दर्शित
‘बाहुबली’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर
सुस्साट कमाई करत आहे.
एस. एस राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर सुस्साट कमाई करत आहे. अवघ्या पाच दिवसांत हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीत कमीत कमी दिवसात
जास्तीत जास्त कमाई करणारा ‘बाहुबली’ हा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाला
जगभरातून प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पाच दिवसांत या
चित्रपटाने जगभरातून तब्बल २१५ कोटींची कमाई केली आहे.
‘बाहुबली’ चित्रपटात राणा दग्गुबुत्ती,
तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टीने आकर्षक भूमिका साकारली आहे. या चित्रपटात
प्राचीन काळातील दोन भावांमध्ये असलेला कलह दाखवण्यात आला आहे. १० जुलै
रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्यात आला.
हा चित्रपट एकाच वेळी तेलगू, तामिळ,
मल्ल्याळंम आणि हिंदी या चार भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. हा
चित्रपट पुढील दोन दिवसांत ४० ते ५० कोटी रुपयांची कमाई करुन २५० कोटींचा
आकडा पार करेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
जगाच्या कानाकोपर्यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अॅन्ड्रॉईड अॅपचे 2.0 हे न्यु लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!
Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/ apps/details?id= pandharpurlive.com
____________________________________










