पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांचे शुभहस्ते पंढरपूर लाईव्ह या साप्ताहिकाच्या प्रथम अंकाचे प्रकाशन

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-

 

‘पंढरपूर लाईव्ह’ या ई- न्युज वेब पोर्टल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप च्या अभुतपूर्व यशानंतर पंढरपूर लाईव्ह या नुतन साप्ताहिकाचा शुभारंभ नुकताच झाला. या साप्ताहिकाचे प्रथम अंकाचे प्रकाशन पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री. किशोर नावंदेसो यांचे शुभहस्ते झाले.

यावेळी श्री.नावंदेसाो आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, भगवान वानखेडे यांचे वेब पोर्टल व अ‍ॅन्ड्रॉईड

अ‍ॅप चे कार्य खुपच समाधानकारक चाललेले आहे. पंढरपूर सारख्या तिर्थक्षेत्राची माहिती महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचवण्यास पंढरपूर लाईव्ह यशस्वी ठरल्याचे पाहुन आनंद वाटतो. पंढरपूर लाईव्ह या साप्ताहिका कडुन ही अशीच अपेक्षा आहे. या वृत्तपत्रासाठी माझ्या आणि आमच्या पंढरपूर शहर पोलस स्टेशनकडून शुभेच्छा असून याद्वारे समाजातील विविध प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे काम हे साप्ताहिक करेल ही अपेक्षा आहे.

यावेळी भगवान वानखेडे म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षापासुन मी पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहे. सा.बुलंद नेता, सा.झंझावात या साप्ताहिकात यशस्वीरित्या कार्य करत समाजातील अनेक प्रश्‍नांना वाचा फोडण्याचे कार्य केले. पंढरपूरकरांनी आणि अनेक हिततचिंतक वाचक-जाहिरातदार बंधु-भगिणींनी मोलाची साथ दिली. अनेक संकटांवर मात करीत अडथळ्यांच्या खाच-खळग्यांचा अनुभव घेत ‘पंढरपूर लाईव्ह’ ची निर्मिती केली आज पंढरपूर लाईव्ह हे ई-न्युज वेब पोर्टल जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांकडून दररोज पाहिले जाते. याद्वारे फक्त बातम्याच नव्हे तर दैनंदीन जीवनात उपयुक्त ठरेल अशी माहिती, मनोरंजक सदरे, महत्वाचे संपर्क, शैअर मार्केट, लाईव्ह क्रिकेट, शासकीय वेब साईटस्, रेल्वे वेलापत्रक, विविध नकाशे आदी महत्वाची माहिती प्रसिध्द करत असल्यामुळे हे वेबपोर्टल व अ‍ॅप वैशिष्ट्येपुर्ण ठरले आहे. हे चालवत असयानाच अनेक वाचकांच्या आग्रहास्तव आणि प्रिंट मिडीयाच्या आवडीमुळे आपण ‘पंढरपूर लाईव्ह’ हे साप्ताहिक सुरु केले आहे. आज या वृत्तपत्राचे प्रकाशन श्री.नावंदे साहेबांचे शुभहस्ते होताना पाहुन मनस्वी आनंद होत आहे. याद्वारे पंढरपूर व परिसरातील विविध घडामोडी बरोबरंच कांही दुर्लक्षीत प्रश्‍नांवर प्रकाश टाकण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे, जेष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे, पत्रकार दिनेश खंडेलवाल, खादी ग्रामोद्योग चे संचालक गणेश सिंघण, पत्रकार माऊली डांगे व एपीआय गोपाळ चावडीकर आदी उपस्थित होते. यावेळी शहर पोलिस ठाण्यातील सर्व अधिकारी व पोलिस बंधुंना भगवान वाखेडे यांचेकडून ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या वतीने पेढे वाटण्यात आले.


जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com

    

********

____________________________________