पंढरपूर ... दि.27 - पंढरपूर येथील मेहतर समाजाच्या मैला सफाई कामगारांनी
आपल्या विविध मागण्यांसाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या आवारात आमरण उपोषण सुरू
केले असून या उपोषणास आज बुधवार दि.27.05.2015 रोजी पंढरपूर-मंगळवेढा
विधानसभा मतदार संघाचे आमदार मा.श्री भारतनाना भालके यांनी भेट दिली.
गेल्या 125 वर्षापासून पंढरपूरात स्वच्छतेचे काम करणार्या मैला सफाई
कर्मचार्यांच्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. विशेषत...
त्यांच्या राहत्या घराचा प्रश्न उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही सुटलेला
नसल्यामुळे तसेच त्यांच्या इतरही मागण्यांसाठी त्यांनी आमरण उपोषण सुरू
केले आहे. सदरवेळी आमदार श्री भारतनाना भालके यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या
मुख्याधिकारी यांना बोलावून घेऊन मेहतर समाजाच्या मागण्यांबाबत त्वरीत
कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या समाजाच्या प्रश्नांबाबत
मा.सचिवांच्या बैठकीमध्ये जो शासन निर्णय झाला व मा.हायकोर्टाच्या
सूचनेप्रमाणे मेहतर समाजाला न्याय देण्याची भूमिका पार पाडावी. त्यांच्या
हक्काची घरे त्यांना उपलब्ध करून दयावीत अशा सूचना दिल्या.
याप्रसंगी
तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ, नगरसेवक संजय घोडके,
बाळासाहेब नेहतराव, सतीशबापू घंटे, नामदेव भुईटे, मा.नगरसेवक किरणराज घाडगे
तसेच महंमद उस्ताद, रवि मुळे तसेच उपोषणकर्ते अंबालाल दोडिया, महेश गोयल
यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.


*********************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!
पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!
अॅन्ड्रॉईड अॅप 10 हजार 864 मोबाईलमध्ये पोहोचले!
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब
पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण
जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. रोजी आज दि. 27-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 1 लाख 4 हजार 576 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज
पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या
‘पंढरपूर लाईव्ह’ हे अॅन्ड्रॉईड अॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!
संबंध
महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्यातील मराठी माणसांनी
आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अॅन्ड्रॉईड अॅप घेतले आहे. आज
हे अॅप घेणार्या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून
दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे.
आज दि. 27-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अॅन्ड्रॉईड अॅप घेणार्या मोबाईल धारकांची संख्या 10 हजार 864 झालेली आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.
आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!
आमचे ई-मेल आयडी jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्रमांक 8308838111 / 8552823399
