प्रबोधनकार ठाकरे चौकात (नविन कराड नाका चौक) कंटेनर अंगावरुन गेल्याने एकजण गंभीर जखमी.....


पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):-

आज दि. 27 मे 2015 रोजी पंढरपूरातील  प्रबोधनकार ठाकरे चौक (नविन कराड नाका चौक) येथे घडलेल्या अपघातामध्ये कंटेनर अंगावरुन गेल्याने एकजण गंभीर तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे.

हा अपघात घडला तेंव्हा चौकात अनेक नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी येथे वारंवार होणार्‍या अपघातामुळे अनेक नागरिक संतप्त झाल्याची चर्चा आहे.


याबाबतचे पंढरपूर शहर पोलिसांकडून समजलेले सविस्तर वृत्त असे की आज सकाळी पंढरपूरच्या प्रबोधनकार ठाकरे चौकात (नविन कराड नाका)कोर्टीकडून येणारा कंटेनर (एम एच 04 जे एफ 2242) याने पंढरपूरकडे निघालेल्या मोटारसायकल (एम पी 47 0949) ला पाठीमागून जोरात धडक दिल्याने मोटारसायकलवरील हमीद पापा शेख (वय 35) रा. गादेगाव, ता.पंढरपूर यांचे कमरेखालील भागावरुन कंटेनर गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने पोलिसांनी येथील जनकल्याण हॉस्पिटल मध्ये दाखले केले. यानंतर पुढील उपचारासाठी सोलापूर ला हलवल्याचे वृत्त असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.  या अपघातात मोटारसायकलवरील दुसरा इसम व फिर्यादी सतीश अनंतराम निराळवाडकर (वय22)  रा.धनगरमोहा, ता.गंगाखेड, जि.परभणी (हल्ली रा. सुरुचि ढाबा, सोनके, ता.पंढरपूर) हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांचे च फिर्यादीवरुन या अपघाताची नोंद पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात झालेली आहे.      यामध्ये मोटारसायकलचे 5000/- रु. चे नुकसान झालेले असून अधिक तपास ए.एस.आय. श्री.रामगुडे हे करत आहेत.



निष्क्रीय प्रशासकीय अधिकारी आणि संवेदनाहीन राजकारण्यांच्या बेजबाबदारपणामुळे लिंकरोडवर वारंवार होतात अपघात..!

आजतागायत या चौकात तसेच क्रांतीसिंह नाना पाटील चौक (केबीपी चौक) येथे तसेच या दोन्ही चौकाला जोडणार्‍या लिंक रोडवर सातत्याने  लहान मोठे अपघात घडले आहेत. यामध्ये अनेक

निष्पापांचे बळी सुध्दा गेलेले आहेत. या मार्गावरील वेगवेगळ्या ठिकाणी असणारी वळणे, एकाही ठिकाणी गतीरोधक अथवा झेब्रा क्रॉसिंग नसणे, दोन्ही चौकात दिशादर्शक आणि इतर सुचना फलक नसणे,   कायमसवरुपी वाहतुक पोलिस नसणे तसेच दोन्ही चौकांमध्ये दिवसेंदिवस पडत असलेला अतिक्रमणाचा विळखा यामुळे येथील अपघातामंध्ये वाढ होताना आढळत आहे. याबाबत सा.झंझावात व पंढरपूर लाईव्ह चे संपादक  भगवान वानखेडे यांनी वेळोवेळी विविध अपघातांचे वृत्त ठळकपणे प्रसिध्द  केलेले आहेत. आणि वरील सर्व बाबींचा उल्लेख ही केलेला आहे. मात्र निष्क्रीय प्रशासकीय अधिकारी आणि संवेदनाहीन राहकारण्यांनी याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे  आणि बेजबाबदारपणामुळे लिंक रोड वर आणि या दोन्ही चौकात वारंवार अपघात होताना आढळत आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की, उपनगरांतील  वाढती लोकसंख्या आणि दरडोई एक वाहन अशी अवस्था असलेने वाहनधारकांची संख्या वाढलेली आहे. पंढरपूरच्या वेगाने विस्तारीत होणार्‍या शहरात त्यामानाने अपुरे पोलिस बळ आहे. त्यामुळे पोलिसही हतबल आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी व राजकीय नेत्यांनी वेळीच पावले उचलून येथील इसबावी च्या विसावा मंदिरामागील प्रस्तावित बायपास रस्ता अवजड वाहनांसाठी सुरु करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक ती पावले तातडीने उचलणे आवश्यक आहे. तसेच नगरपालिकेने या दोन्ही चौकात अवजड वाहतुकीबाबत बायपास च्या सुचना व दिशादर्शक असणारे फलक त्वरीत लावणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा या घटनांना लगाम घालणे प्रत्यक्ष पांडुरंगाच्याही हातात नाही असेच म्हणावे लागेल.

*******

यावर आपल्या कांही प्रतिक्रिया फेसबुकच्या माध्यमातून पंढरपूर लाईव्ह वाचकांनी व्यक्त केल्या यापैकी कांही बोलक्या प्रतिक्रिया बघा....


  • Nilesh Nagane Lokani jagruk asayla hva

  • Dipak Gaikwad ·
    On link road speed breakrs is important, or necessary to clg road, panchayat samiti,takli road road,isbavi road , korti road, or heavy vehicle routes are outside from city, bypass is very important for truck, tractors, container,

  • Bipin Bhosale ·
    PWD ची कृपा दुसरे काय ? आजुन निष्पाप बळी जाण्यापुवी Speed Breaker बसवा ......

  • Moin Iliyas Shaikh Sagle milun kam karyla pahje

  • Shashikant Haridas अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी रस्ता दुभाजकाची गरज आहे. भरधाव वाहतुक रोखण्यासाठी गतीरोधक आवश्यक. तातडीने कार्यवाही व्हावी

  • Virendra Swami या मार्गावर भलीमोठी वाहने जात असतात ,याच्या अभ्यास तेथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकारीवर्गाने केला आहे काय.? व तसेच या वाहनांना अश्या प्रकारे शहराच्या मध्यातून जाण्यास परवानगी R.T.O. व पोलीस खात्यांनी कशी काय दिली ? साऱ्या राज्याचे कुलदैवत असलेल्या पांडुरंगाच्या नगरीत या हम रस्त्यावर अवजड वाहनकसे काय राज रोस पणे येवू दिले जातात, स्वर्ण चतुष्कोन हायवे वर चा टोल वाचवण्यासाठी व अंतर कमी होते म्हणून दक्षिणेकडून राज्यातील येणारी व उत्तरेकडे जाणारी वाहतूक पंढरपूर या भक्तीच्या नगरीतून वळविली जाते आहे याला कोणत्याच वाहतूक अधिकारी वर्गाचा आक्षेप कसा काय नोंदविला गेला नाही हे विचारणीय आहे.या प्रकरणांत अनेक खात्यातील अधिकारी वर्गाचे हात जरूर ओले होत असतील.पंढरीत पायी येणाऱ्या भक्तांची वर्णी जास्त असते तसेच पर्यटक व भक्त जन आपल्या वाहतून येत असतात , त्या मुळे या मार्गाने होणारी हि मोठी वाहतूक पंढरपुरच्या बाहेरून किमान 20-30 किमी वळविणे हे च महत्वाचे ठरणार आहे, तसेच या रस्त्यावर वर अनेकांनी उल्लेख केल्या प्रमाणे रस्ता दुभाजक , गतिरोधक व प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसांच्या चोक्या उभारणे अत्यंत जरुरीचे व क्रम प्राप्त आहे या भागातील नागरिकांचे हित जोपासावे व विना अपघात नगरीतून प्रवास घडावा, हीच पांडुरंग चरणी प्रार्थना..





*********************



 

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!


पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप  10 हजार 864 मोबाईलमध्ये पोहोचले!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.

  आज दि.  रोजी आज दि. 27-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 1 लाख 4 हजार 576 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या

‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!

संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्‍यातील मराठी माणसांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेतले आहे. आज हे अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. 

आज दि.  27-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या   10  हजार 864 झालेली  आहे. 


‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399