सोशल मिडीया वापरताय..? तर मग सावधान..! फेक किंवा अननॉन अकाऊंटवरुन हॅक होऊ शकते तुमचे फेसबुक किंवा अन्य सोशल मिडीया अकाऊंट... काय घ्याल काळजी! पंढरीतील एकाचे फेसबुक अकाऊंट अफगाणिस्तानातील एकाने केले हॅक...!!!

पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2019


पंढरपूर (प्रतिनिधी):- आपण फेसबुक वापरत आहात का? तर मग फॅेसबुकचा वापर सावधानतेने करा. पंढरीतील सुप्रसिध्द व्यावसायीक अमोल वाखरकर यांचे फेसबुक अकाऊंट  Lives in  काबुल, अफगाणिस्तान असा पत्ता असलेल्या Tulea Oleg या फेसबुक धारकाने हॅक केल्याची माहिती स्वत: अमोल वाखरकर व त्यांचे मित्र राहुल राजुरकर यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली आहे. सदर व्यक्ती ही वाखरकर यांच्या फेसबुक फे्रंड लिस्टमध्ये सामील होती. परंतु त्याने अकाऊंट हॅक केल्यानंतर स्वत: वाखरकर यांना स्वत:चे अकाऊंटचा पासवर्ड आयडी टाकुनही स्वत:चे फेसबुक अकाऊंट उघडता आले नाही. ना हॅक करणार्‍याचे अकाऊंट बघता आले. त्यामुळे वाखरकर यांना नाईलाजाने नवीन फेसबुक अकाऊंट काढावे लागले. परंतु त्यांच्या जुन्या फेसबुक वरील जुन्या शेअर केलेल्या आठवणी मात्र कायमच्या पुसून गेल्या. सदर व्यक्तीच्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्ये पंढरीतील आणखीही कांहीजण आहेत असे समजते. या व्यक्तीने वाखरकर यांचे फेसबुक अकाऊंट का? व कशासाठी हॅक केले? याची माहिती अद्दयाप समजु शकली नाही. परंतु निश्‍चितच यामागे त्याचा कांही तरी वाईट हेतु असावा हे मात्र नक्की. सदर व्यक्तीने पंढरीतील अन्य एकाचेही फेसबुक अकाऊंट हॅक केल्याची माहिती समजते. 
हाच तो वाखरकर यांचे फेसबुक अकाऊंट हॅक करणाराचा फेसबुक प्रोफाईल.... 



मित्रांनो आपणास फेसबुकवरुन किंवा अन्य सोशल मिडीयावर कोठूनही कोणीही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवु शकतो. तेंव्हा सदर घटनेचा अभ्यास केला तर आपण फेसबुक किंवा अन्य सोशल मिडीयावर सक्रीय असताना कांही काळजी घेणेही आवश्यक आहे. हे स्पष्ट झाले असल्याचे दिसून येते.



काय घ्याल काळजी?

आपणास कुणी अनोळखी व्यक्तीने फेसबुकवरुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली तर सदर व्यक्तीची प्रोफाईल व्यवस्थीत तपासा. त्याने अकाऊंट कधी काढले? त्याचा प्रोफाईल पिक्चर नेमका त्याचाच आहे का? फेसबुक अकाऊंट काढताना त्याने आपली माहिती सविस्तरपणे नोंदवलेली आहे का? त्याने आजतागायत कोणकोणत्या पोष्ट शेअर केल्या आहेत? त्याचे मित्रपरिवारात कोण कोण सदस्य आहेत? ही सर्व माहिती सखोल तपासून घेतल्याशिवाय अशा अननॉन फ्रेंड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करु नका. 

यासाठी तुमच्या फेसबुकची सेक्युरिटी सेंटींग्सही व्यवस्थीत सेट करा. तुम्हाला कोणी स्वत:च्या पोष्ट टॅग केल्या तर त्या पोष्ट तुमच्या प्रोफाईलवर दिसाव्यात किंवा नाही याचा अधिकार सर्वस्वी तुमच्याकडे असतो. यासाठी तुमच्या सेक्युरिटी सेटींग्स मध्ये जाऊन टाईमलाईन सेटींग ऑन ऑफ करु शकता.  याद्वारे तुमचे फोटोज, तुमच्या पोष्ट या फक्त तुमच्या फ्रेंड लिस्टमधील फेसबुकधारकांनाच दिसायला हव्यात किंवा फक्त तुम्हालाच अथवा ठराविक मित्रांनाच दिसाव्यात हे सर्व तुम्ही ठरवु शकता. 


आणखी एक महत्वाचे म्हणजे आपल्या ई-मेल, फेसबुक, व्हॉटसअप आपल्या मोबाईलमध्ये लॉग इन करताना त्या सेटींग्जमध्ये इतर कोणत्याही डेक्सटॉप, मोबाईल, लॅपटॉप वरुन कुणी जर तुमचे वरील अकाऊंट उघडण्याचा प्रयत्न केला तर त्यासंबंधीचा चेतावणी देनारा मेसेज सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर येऊ शकतो. व त्यामुळे सदर अकाऊंट हे तुम्हीच ओपन करताय का अन्य कोणी ते तात्काळ समजते. यासाठी आपल्या सोशल मिडीया अकाऊंटला आपला चालु मोबाईल क्रमांक अवश्य जोडून घ्या. सर्वात महत्वाचे हे करा की, तुम्ही ज्यांना खरेच संपुर्णपणे ओळखता अशांशीच चॅटींग करा. अशांशीच फेसबुक, व्हॉटसअप, किंवा अन्य सोशल मिडीयाद्वारे कनेक्ट रहा. उगाच कुणाचे तरी भपकेबाजपणाला भाळु नका. शेवटी हे जग आभाशी आहे. हे मात्र विसरु नका!

पंढरपूर लाईव्हचा हा विशेष लेख जर आपणास आवडला असेल तर शेअर नक्की करा. 




महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com