मंगळवेढा तालुक्यातील तरूण शेतकऱ्याची आत्महत्या

पंढरपूर LIVE 30 जानेवारी 2019


मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथील सुरेश चंद्रकांत धायगुंडे (व्यक्त २३)
या शेतकऱ्याने अज्ञात कारणावरून विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली असल्याचे समजते.

आज सायंकाळी त्याने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे समजते. अद्याप तरी आत्महत्येचे कारण समजले नाही. परंतु एका तरूण शेतकऱ्याने अशा पध्दतीने हतबलपणे आत्महत्या केल्याने मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



ही घटना बुधवारी (दि. ३० जानेवारी) सायंकाळी उघडकीस आली. या तरुण शेतकर्‍याचा भाऊ मलकारी धायगुंडे यांनी मंगळवेढा पोलिस स्टेशनमध्ये याबाबतची खबर दिली. मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी भेट देत अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत सीआरपीसी १७४ नुसार या घटनेची नोंद केली आहे. 

सुरेश धायगुडे हा अविवाहित असून तो पाणकप्पी चालविण्याचा व्यवसाय करीत होता. सुरेश धायगुंडे याच्या शतीत तीन एकर डाळिंब बाग शेती आहे.  उत्पन्न कमी व खर्च जास्त असल्याने मंगळवेढा तालुक्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. सलगर बुद्रुक हा परिसर कायम दुष्काळी समजला जातो.






महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com