चंद्रभागा नदीच्या वाळवंटामध्ये महिलांसाठी चेजींग रूम उभारण्याची राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीची मागणी
पंढरपूर LIVE 29 जानेवारी 2019
पंढरपूर । प्रतिनिधी,
पंढरपूर ही संतांची भूमी, दक्षिण काशी, पांडुरंगाचे पवित्र देवस्थान असून या तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश व इतर राज्यातूनही मोठ्या प्रमाणात वारकरी दर्शनासाठी येत असतात. तसेच आषाढी, कार्तिकी, चैत्र व माघी वारीला दहा लाखांच्यावर भाविक / वारकरी पंढरपूरात येतात. याशिवाय दररोज किमान 25 ते 30 हजार वारकरी भक्त पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरात येत असतात. यामध्ये महिला वारकरी भक्तही मोठ्या प्रमाणात दर्शनास येतात. यापैकी बहुतांश वारकरी हे चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेत असतात. महिला वारकरी / भाविक त्यांचे जवळच्या नातेवाईकांसमवेत चंद्रभागेमध्ये पवित्र स्नान करीत असतात. महिला वर्गाची वारकरी चंद्रभागेत स्नान करण्याची मोठी संख्या आहे. परंतू चंद्रभागेच्या वाळवंटात किंवा तिरावर महिलांना स्नानानंतर कपडे बदलण्यासाठी आम्ही केलेल्या यापुर्वीच्या विनंतीवरून एकदा तात्पुरता प्रयोग केला होता. परंतू अत्यंत निकृष्ट डिजीटल बोर्डाचे कापड लावल्याने वादळ वाऱ्याने फाटून गेले, तेव्हापासून आजतागायत पुन्हा कायमस्वरूपी सोय उपलब्ध करून दिल्या नाहीत.
त्यामुळे महिलांना स्नानानंतर कपडे बदलणे गैरसोयीचे होत असून लज्जास्पद वर्तुणूकीस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीच्या पात्रात व वाळवंटात महिलांसाठी कायमस्वरूपी चेजींग रूमची उभारणी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडी पंढरपूर शहर यांच्यावतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या प्रदेश सचिव व सोलापूर जिल्हा पक्ष निरीक्षक निर्मला बावीकर, पंढरपूर शहराध्यक्षा रंजनाताई हजारे यांनी राज्याचे वित्त व नियोजनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
सदरचे निवेदन दिल्यानंतर ना.मुनगंटीवार यांनी महिलांच्या अस्मितेच्या या प्रश्नात नक्की लक्ष घालून लवकरच चेजींग रूम उभारण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्षा राधा मलपे, ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षा साधना राऊत, पंढरपूर तालुकाध्यक्षा अनिता पवार, शहर उपाध्यक्ष जयश्री राऊत, अनिता नगरे, शहर चिटणीस सरस्वती बनसोडे, जयश्री वाघमारे, मोनाली हजारे, संगीता पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
या निवेदनात असे म्हटले आहे की, आपण राज्याचे अतिशय संवेदनशील मंत्री आहात. महिलांना आर्थिक / सामाजिक उन्नतीसाठी आपण सदैव प्रयत्नशील आहात. आपल्याकडून वारकरी महिलांची समस्या सुटू शकते. पालखी मार्गावर जशी आपण निर्मलवारी केली तशी महिला वारकऱ्यांच्या अस्मीतेसाठी त्यांना फिरते चेंजींग रूम्स करून द्यावेत, तसे आदेश जिल्हा प्रशासन व पंढरपूर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीला देवून लाखो वारकऱ्यांचा दुवा घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, आपण राज्याचे अतिशय संवेदनशील मंत्री आहात. महिलांना आर्थिक / सामाजिक उन्नतीसाठी आपण सदैव प्रयत्नशील आहात. आपल्याकडून वारकरी महिलांची समस्या सुटू शकते. पालखी मार्गावर जशी आपण निर्मलवारी केली तशी महिला वारकऱ्यांच्या अस्मीतेसाठी त्यांना फिरते चेंजींग रूम्स करून द्यावेत, तसे आदेश जिल्हा प्रशासन व पंढरपूर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीला देवून लाखो वारकऱ्यांचा दुवा घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com