सुवर्ण पदक विजेत्यांना १ लाख, रौप्य विजेत्यांना ७५ हजार आणि कांस्य विजेत्यांना ५० हजाराचे पारितोषिक- विनोद तावडे

पंढरपूर LIVE 31 जानेवारी 2019         

               
  मुंबई, दि. ३१ : केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्वितीयखेलो इंडिया युथ गेम्स २०१९ मध्ये तब्बल २२७ पदके प्राप्त करून महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरला आहे. खेळाडूंच्या गुणवत्ता उंचावण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्यावतीने सुवर्ण पदक विजेत्यांना एक लाख रूपयेरौप्य पदक विजेत्यांना ७५ हजार तर कांस्य पदक विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांचे पारितोषिक जाहीर केले आहेअशी घोषणा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज केली.               





खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ नुकतेच यशस्विरित्या पुणे येथे पार पडले. राष्ट्रस्तरीय या गेम्समध्ये महाराष्ट्राला ८५ सुवर्ण, ६१ रौप्य आणि ८१ कांस्य असे पदके मिळविण्याचा मान मिळाला आहे. या खेळाडूंचा अभिनंदन सोहळा आज मुंबईत आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. तावडे बोलत होते. या कार्यक्रमास अपर मुख्य सचिव वंदना कृष्णाक्रीडा विभागाचे आयुक्त सुनील केंद्रेकरउपसचिव राजेंद्र पवार आदींसह राज्यभरातून आलेले खेळाडूंचे प्रशिक्षक आणि पालकही उपस्थित होते.
       राज्यातील उत्तोमोत्तम खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य मिळावे यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत श्री तावडे म्हणालेया विजयानंतर खेळाडूंची जबाबदारी आणखीनच वाढली असूनसर्वांच्या अपेक्षाही खेळाडूंकडून वाढल्या आहेत. आगामी आशियाई आणि २०२८ मधील ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचा तिरंगा फडकवण्याचे ध्येय खेळाडूंनी आता बाळगावेअसे आवाहन श्री. तावडे यांनी केले.

शालेय शिक्षण घेत असताना या विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा विद्यार्थ्यांचा विचार करूनराज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मुक्त मंडळ स्थापन केले असूनखेळांचा सराव करत असताना खेळाडूंना आपले शिक्षणही पूर्ण करता येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येणार आहेअसेही श्री. तावडे यांनी सांगितले.
       श्री. तावडे म्हणालेभविष्यात खेळाडूंना अधिक प्रोत्साहन मिळावे आणि गुणवंत आणि उदयोन्मुख खेळाडू देशाला मिळाले यासाठीतालुका स्तरावर खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात पाच गुणजिल्हास्तरराज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे १०१५आणि २० गुण प्रदान करण्यात येणार आहेत. याचबरोबरराज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंसाठी शासकीत सेवेत सामावून घेण्यासाठी पाच टक्के आरक्षण देण्यात येत आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेत्या खेळाडूंना थेट शासकीय नोकरीत सामावून घेतले जाणार असल्याचेही श्री तावडे यांनी यावेळी सांगितले.


यावेळी श्री. तावडे यांनी खेलो इंडिया मधील विजेते खेळाडू/प्रशिक्षक व पालकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. खेळाडूंच्या तसेच प्रशिक्षकांच्या समस्यांना सोडविण्यासंदर्भात शासन सकारात्मक भूमिका घेईलअसेही श्री. तावडे यांनी स्पष्ट केले.


केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने द्वितीय खेलो इंडिया युथ गेम्स२०१९ चे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडीपुणे व मुंबई येथे ८ ते २० जानेवारी २०१९ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशातून ७ हजार ५०० खेळाडू१ हजार ५०० तांत्रिक अधिकारी व स्वयंसेवकसंयोजन समितीवैद्यकीय व सुरक्षा इ. साठी सुमारे १ हजार अधिकारी व कर्मचारी सहभागी झालेले होते.
खेलो इंडिया युथ गेम्स क्रीडा बाबी- जिम्नॅस्टिक्सवेटलिफ्टिंगज्युदोकुस्तीबॅडमिंटन,ॲथलेटिक्सशुटींगफुटबॉलहॉकीखो-खोजलतरणबॉक्सींगकबड्डीलॉन टेनिस,व्हॅालीबॉलबास्केटबॉलटेबल टेनिसआर्चरी अशा १८ खेळांच्या क्रीडा स्पर्धा १७ ते २१ वर्षाखालील मुले व मुलीसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com