पंढरपूर सिंहगड मध्ये रिलायन्स जिओचा इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी ‘जिओ आरंभ’ या प्रकल्पाचे उद्घाटन

पंढरपूर LIVE 8 जानेवारी 2019


   पंढरपूर (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात रविवारी ६ जानेवारी रोजी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘जिओ आरंभ’ या प्रकल्पाचे उद्घाटन रिलायन्स जिओ कंपनीच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
    
या कार्यक्रमाची सुरुवात विद्येचे आराद्यदैवत असलेल्या सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डॉ. मुनीर सय्यद, देव्वपन्न, सतिश नाईर, सोलापूर सिंहगड अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, डॉ. राजश्री बाडगे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने रिलायन्स जीओ कंपनीच्या पदाधिका-यांचा सन्मान करण्यात आला.
    
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मुनीर सय्यद म्हणाले, रिलायन्स जीओ ही एक अशी कंपनी आहे की, या कंपनीत इंजिनिअरींगच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे. रिलायन्स जीओ ची नवीन संकल्पना हि इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी आरंभ असणार आहे. रिलायन्स ची नवी संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी सिंहगड इन्स्टिट्यूटचे वातावरण शैक्षणिक सेवा-सुविधा हा पुरक आहेत. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या सिंहगड इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांना मिळणारे ज्ञान हे अतिशय उत्तम आहे.
 

    शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ मध्ये कॉम्प्युटर सायन्स ॲड इंजिनिअरींग विभाग व इलेक्ट्रॉनिक्स ॲड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेन्ट ड्राईव्ह घेण्यात आला. या मधुन सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. राजश्री बाडगे यांनी केले. 













महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com