जवाना प्रति कृतज्ञता... बातमी एका निवृत्त सैनिकाच्या सेवा निवृत्तीच्या निरोप समारंभाची!

पंढरपूर LIVE 8 जानेवारी 2019

तुमचं आमचं देशप्रेम हे फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला उफाळून येते...त्यानंतर सार्‍याच बाबीचा आपल्याला विसर पडतो...पण नाशिककरांनी प्रमोदवर केलेला हा प्रेमाचा वर्षांव देशावर बेगडी प्रेम करणार्‍यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा तर आहेच शिवाय नव्या पिढीला सैन्य दलात जाण्यासाठी प्रेरित करणारा असाच होता..
व्हिडीओ बातमी...



बातमी आहे एका सैनिकाच्या निरोप समारंभाची...हे वाक्य ऐकून तुम्हीही चकीत झाला असाल...कारण निरोप समारंभ, वाढदिवस याच्या बातम्या आपल्याला फक्त बडे अधिकारी आणि राजकारणातील बड्या हस्ती यांच्याच पाहण्याची सवय झालीय...
पण या प्रथेला छेद देण्याचे काम नाशिकरांनी करुन दाखवलंय, ते ही एका निवृत्त सैनिकांचा जंगी निरोप समारंभ घडवून... 


नाशिकच्या कमोद नगरातील ही अभिमानास्पद घटना आहे. शनिवारी रात्री देशभक्तीपर गीत आणि भारतमाता की जय च्या नार्‍यांनी कमोद नगरातील साई वंदन सोसायटी दणाणून गेली होती...
 त्याच असं झालं कमोद नगर सोसायटीचा एक सदस्य असलेला प्रमोद हळवे नामक जवान आपली सैन्य दलातील 22 वर्षे सेवा बजावून 31 डिसेंबर 2018 रोजी सेना दलातून निवृत्त झालाय. 
नायक प्रमोद हळवे यांनी देशाप्रती दाखवलेला त्याग आजवर घेतलेले कष्ट याची दखल घेत नाशिककर प्रमोदच्या कर्तृत्वाचा गौरव व ऋतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठ्या आनंदाने एकवटले होते...
शाही व्यासपीठावर सोसायटी मधील महिलांनी प्रमोदचे औक्षण करुन प्रमोद आणि त्यांच्या पत्नी कांचन हळवे यांचा यथोचित सत्कार करुन निवृत्ती नंतरच्या कौटूंबिक आयुष्याला शुभेच्छा दिल्या...

नाशिककरांनी दिलेल्या गुलाब पुष्पच्या शुभेच्छा आणि व्यक्त केलेली मनोगत ऐकून सीमेवर शत्रूशी दोन हात करणार हा जवान आनंदाश्रूत डबडबून गेला ...
या अनोख्या निरोप समारंभ सोहळ्यात प्रमोदची आई, सासूबाई, भाऊ, मित्र आणि मोठ्यासंख्याने नातेवाईक सहभागी झाले होते...
22 वर्षे भारतमातेचे सेवा करुन आपला मुलगा सुखरुप घरी पोहचला याचा आनंद या दोन मातामाऊलीसह त्यांच्या पत्नीच्या आणि मुलांच्या चेहर्‍यावर जाणवत होता...
या सोहळ्यात प्रमोदला जेव्हा त्यांच्या पत्नी आणि आईने गळाभेट दिली तेंव्हा उपस्थित असलेल्या सर्वांचा उर भरुन आला आणि डोळ्याच्या कडाही ओलावल्या...
तुमचं आमचं देशप्रेम हे फक्त 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला उफाळून येते...त्यानंतर सार्‍याच बाबीचा आपल्याला विसर पडतो...

पण नाशिककरांनी प्रमोदवर केलेला हा प्रेमाचा वर्षांव देशावर बेगडी प्रेम करणार्‍यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा तर आहेच शिवाय नव्या पिढीला सैन्य दलात जाण्यासाठी प्रेरित करणारा असाच होता...यासाठी केवळ प्रमोदला सलाम करुन चालणार नाही तर त्याच्या कार्याची दखल घेऊन त्याचा यथोचित गौरव करणार्‍या नाशिक करांना सलाम करायला हवा....














महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com