श्री विठ्ठल अभियांत्रिकीचे प्रा.संदीप वांगीकर यांना पी.एच.डी. प्राप्त

पंढरपूर LIVE 14 जानेवारी 2019

 

 स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील प्रा. संदीप वांगीकर  यांनी  पी.एच.डी. मिळविल्याबद्धल बी. फार्मसीचे उपप्राचार्य डॉ. अमित गंगवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोबत डावीकडून विश्वस्त सुरज रोंगे, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवेकॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगे, प्रशासन अधिष्ठाता डॉ. आर.आर. गिड्डे, बी. फार्मसीच्या प्राचार्या डॉ. एस. डी. सोनवणे.

पंढरपूर- येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल  इंजिनिअरिंग  विभागातील प्रा. संदीप सीताराम वांगीकर यांना नुकतीच  सिलचर (आसाम) मधील एन.आय.टी. तथा राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानमधून अभियांत्रिकीच्या डिझाईन अँन्ड डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोचॅनेल फॉर इफेक्टीव्ह मिक्सिंग ऑफ मल्टीफ्लूइडस्’ या विषयात पी.एच.डी. प्रदान करण्यात आली. त्यांनी आपला प्रबंध प्रौद्योगिकी संस्थेमध्ये सादर केला होता. या प्रबंधावरून त्यांना पी.एचडी. प्रदान करण्यात आली. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.                     
            


सिलचर मधील एन.आय.टी.च्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील डॉ. पी.के.पटवारी व डॉ. आर. डी. मिश्रा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखालीस्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या प्रेरणेने प्रा.वांगीकर यांनी पी.एचडी. पूर्ण केली. त्यांना आईवडील भावंडेपत्नी सौ. विद्या यांच्यासह इतर प्राद्यापकांचेही बहुमोल सहकार्य लाभल्याचे डॉ. वांगीकर यांनी सांगितले. पी.एच.डी. प्राप्त केल्याबद्धल स्वेरीच्या वतीने डॉ. वांगीकर यांचा सत्कार करण्यात आला. 

डॉ. वांगीकर हे स्वेरीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात गेल्या नऊ वर्षापासून उत्कृष्टपणे ज्ञानदान करत आहेत. त्याचबरोबर एन.आय.टी. कालिकत (केरळ)स्वेरीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेऊन संशोधन पेपर सादर केले होतेचार आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये आणि दोन बुक चॅप्टरमध्ये शोध प्रबंध प्रकाशित झाली आहेत तसेच एका जर्नल पेपरसाठी इन्स्टिटयुट फॉर एकस्प्लोरिंग अॅडव्हान्सेस इन इंजिनिअरींग (आय.इ.ए.इ) यांच्यातर्फे रिसर्च एक्सलन्स अवार्ड घोषित झाले आहे. यावेळी संस्थापक सचिव डॉ. बी.पी.रोंगेसंस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, विश्वस्त सुरज रोंगे  यांच्यासह इतर स्वेरीचे पदाधिकारी व विश्वस्तसंस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणेडिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळडी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवेसर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुखसर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी डॉ. वांगीकर यांचे अभिनंदन केले.






महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com