आयआयटी कॉम्प्युटरला सर्वोत्कृष्ट पारितोषिक

पंढरपूर LIVE 15 डिसेंबर 2018


पंढरपूर : महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातर्फे कॉम्प्युटर कोर्स एमएससीआयटी, क्लिक डिप्लोमामध्ये सर्वाधिक प्रवेश नोंदविल्याबद्दल पंढरपूर येथील आयआयटी कॉम्प्युटर सेंटरला प्रथम क्रमांकाचे सर्वोत्कृष्ठ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. 
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांच्या हस्ते आयआयटीचे संचालक नितिन आसबे यांना हे पारितोषिक प्रदान करण्यात आले. क्लिक टॅली, क्लिक इंग्लिश या कोर्समध्येही आयआयटीने आघाडी घेतली आहे. मागील २० वर्षापासून आयआयटी ही संस्था विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे देत आहे.
यावेळी विभागीय सरव्यवस्थापक अतुल पतोडी, विकास देसाई, अमित रानडे, हेमंत वंदेकर, महेश पत्रिके, रोहित जेऊरकर, हारून शेख, मलिक शेख, शिवानंद पाटील यांनी अभिनंदन केले.


    










महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com