परिचारक यांच्या वाड्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बोंबाबोंब आंदोलन... ऐन दिवाळसणात जिल्ह्यातील साखर कारखानदारांच्या नावाने शेतकर्‍यांचा शिमगा...!

पंढरपूर LIVE 6 नोव्हेंबर 2018






पंढरपूर येथील परिचारक यांच्या वाड्यासमोर आज स्वाभिमानी शेतकररी संघटनेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 9.5 रिकव्हरी बेस प्लस शासनाने वाढविलेले 200 अधिक 1% 289 याप्रमाणे दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील साखर विविध साखर कारखान्यांच्या चेअरमनच्या घरासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून ऐन दिवाळसणात चटणी-भाकरी खाऊन शेतकरी बांधव साखर कारखानदारांच्या नावाने शिमगा करताना आढळून येत आहेत. एफआरपी अधिक दोनशे रुपये मिळायलाच हवी ही आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे.



आज आंदोलनाच्या पहिल्या दिवशी श्रीपांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन परिचारक यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष समाधान फाटे, जिल्हा उपाध्यक्ष निवास भोसले, युवा आघाडी तालुका अध्यक्ष सचिन पाटील, तालुकाध्यक्ष नवनाथ माने, उपाध्यक्ष किर्ती गायकवाड, अमर इंगळे, मेजर नागटिळक, बंडु सावळे, राजु सावळे, श्रीनिवास नागणे, शहराध्यक्ष अतुल कारंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. 

















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com