कल्याणराव काळे मित्रमंडळाने भोसे येथील दलितबांधवांची दिवाळी केली गोड... सामाजिक कार्यकर्ते हणुमंतराव मोरे यांचा स्तुत्य उपक्रम

पंढरपूर LIVE 6 नोव्हेंबर 2018


पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील दलित बांधवांना अल्पदराने साखर वाटप करुन त्यांची दिवाळी गोड करण्याचं सद्कार्य येथील कल्याणराव काळे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले. विठ्ठल सह.साखर कारखान्याचे संचालक उत्तम नाईकनवरे यांचे शुभहस्ते संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे नेटके नियोजन सामाजिक कार्यकर्ते हणमंतराव मोरे यांनी उत्तमरित्या केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्‍वनाथबापु कोरके,सहकार शिरोमणीचे संचालक नागेश ङ्गाटे, काँग्रेस सेवादलचे विजय भिंगारे, हरीभाउ मुजमुले, लक्ष्मण नलवडे, आप्पा थिटे, आण्णा धोत्रे, पिंटु टरले, सदाशिव व्यवहारे, दत्तात्रय जमदाडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.





यावेळी प्रास्ताविक करताना सामाजिक कार्यकर्ते हणमंत मोरे म्हणाले की, सध्या दुष्काळी परिस्थितीने असताना महागाई वाढलेली आहे. त्यामुळे
गोरगरीबांना दिवाळी साजरी करता येत नाही. म्हणून गोर गरीबांची दिवाळी गोड करण्यासाठी कल्याणराव काळे मित्र मंडळाच्यावतीने गेल्या 15 वर्षापासून साखरेचे वाटपाबरोबरच इतर सामाजिक कार्यक्रम राबवून समाजात सामाजिक बांधीलकी कल्याणराव काळे मित्र मंडळाच्या वतीने जोपासलेली आहे.
यावेळी उत्तम नाईकनवरे म्हणाले की, हणमंत मोरे यांनी स्वखर्चाने ऐन दुष्काळामध्ये दलित वस्तीत बोअर पाडून पाण्याची तहान भागविली होती तर रक्षाबंधन, शालेय साहित्य वाटप, गोर गरीब मुला-मुलींच्या लग्नासाठी आर्थिक सहकार्य, तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम अशी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.












या कार्यक्रमाप्रसंगी शेखर मोरे, अमोल नाईकनवरे,आप्पा अडगळे, बाळु थिटेे, बाळु जाधव, धोंडीराम नाईकनवरे, रतन नाईकनवरे, तुकाराम गावडे, सचिन लोंढे, अजिनाथ अडगळे, दत्तात्रय शेरखाने, विष्णु अडगळे, नागेश गांवधरे, विलास तळेकर, अमोल देवकर, अर्जुन माळी, साधु गोडसे, बबन नाईकनवरे,
अरुण अडगळे, हणमंत नाईकनवरे, अंबादास माळी, दत्तात्रय कोरके, आण्णा नायकुडे, श्रीधर नाईकनवरे, विजय भिंगारे यासह कल्याणराव काळे मित्र मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. 



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com