दिवाळीत रंगली स्वरमयी दिपसंध्या

पंढरपूर LIVE 7 नोव्हेंबर 2018


  येथील प्रतिभा क्रिएशन्सच्या वतीने दिवाळीच्या पूर्वसंध्येची दिपसंध्या ही आनंदाच्या स्वरांनी रंगली गेली. अभंग , निर्गुणी भजन , गझल अशा ऐकापेक्षा एक सरस गीतानी उपस्थितांची कलाकारांनी  मने जिंकली. 
    येथील जिजामाता उद्यानामधे सोमवारी संध्याकाळी   प्रतिभा क्रिएशन्सच्या वतीने दिपसंध्या या कार्यक्रमाचे आयेाजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांची सुरूवात आ. प्रशांत परिचारक , ज्येष्ठ चित्रकार श्रीपाद सावळे सर यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. याप्रसंगी भागवताचार्य वा. ना. उत्पात , प्रचार्य डॉ मिलिंद परिचारक , नगरसेवक संग्राम अभ्यंकर , मुन्नागीर गोसावी, दिपक शेटे , 





हरिष ताठे ,उदय उत्पात , शांताराम कुलकर्णी , माधुरी जोशी , दिपक इरकल आदि उपस्थित होते.
         सायंकाळी  दिवा ळीनिमित्त आयोजित केलेल्या या सांगितीक कार्यक्रमामधे येथील उदयोन्मुख गायिका रश्मी कुलकर्णी इंचगावकर तसेच वैभव केंगार यांनी गीते सादर केली. यामधे सुंदर ते ध्यान , काळ देहासी , पंढरपूरीचा निळा.. , सूर निरागस हो ... , गगन सदन , मोह मोह के धागे , जीव रंगला , हदयी प्रीत जागते , निर्गुणी भजन , दिल कि तप्पीश , चंद्र आहे साक्षीला... , आणि 'या झोपडीत माझ्या... ' असे  दर्जेदार गीते सादर करण्यात आली. या गायकांना साथसंगतीला पखवाजासाठी ज्ञानेश्वर दुधाणे , तबल्यासाठी माउली खरात , किबोर्डसाठी अविनाश इनामदार तर अक्टोपॅडसाठी किरण ठाणेदार तर खंजीरीवर धनंजय मनमाडकर यांनी साथ केली. तर कार्यक्रमाचे निवेदन संदिप पिटके यांनी केले.  
   









दिव्यांनी लखलखलेल्या जिजामाता उद्यानामधे आकाशनकंदीत , फुलबाज्या उडवित सदरचा कार्यक्रम सादर करण्यात आला. याचबरोबरीने आषाढी यात्रेमधे घेण्यात आलेल्या छायाचित्र स्पर्धेचे प्रदर्शन देखिल यावेळी भरविण्यात आले होते. ज्येष्ठ चित्रकार श्रीपाद सावळे सर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन करून विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. 
   सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  प्रतिभा क्रिएशन्सचे अध्यक्ष ज्ञानेश बोंबलेकर , उपाध्यक्ष कन्हैय्या उत्पात , सचिव विशाल तपकिरे , कार्याध्यक्षा विनया उत्पात  , संकेत कुलकर्णी , पदमनाभ देवडीकर ,स्वप्नील जोशी , वासुदेव पुजारी , सचिन अनवलीकर , शशांक चिंचणीकर , अमन देशपांडे , रेणूका बडवे आदिंनी परिश्रम घेतले आहेत.  




महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com