प्रतिभा क्रिएशन्सच्यावतीने दिवाळीनिमित्त 'दीपसंध्या'

पंढरपूर LIVE 4 नोव्हेंबर 2018



पंढरपूर -- 

            येथील प्रतिभा क्रिएशन्सच्या वतीने खास दिवाळीनिमित्त दीपसंध्या या सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.  तसेच छायाचित्र प्रदर्शन देखील या निमित्ताने आयोजित केले असल्याची माहिती सदस्य संदीप पिटके यांनी दिली. 
              


प्रतिभा  क्रिएशन्सच्या वतीने प्रतिवर्षी दिवाळीमध्ये दिवाळी गीते तसेच इतरही भावगीत-भक्तिगीत अशा सुरेल संगीताची मैफल होत असते. यंदाच्या वर्षी देखील ५ नोव्हेंबर २०१८ वार सोमवार रोजी दीपसंध्या या सुमधुर गीतांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  सदरचा कार्यक्रम येथील जिजामाता उद्यानामध्ये सायंकाळी ठीक सहा वाजता होणार आहे . याचवेळी पंढरपूर आणि आषाढी यात्रेमधील विविध अनोख्या अशा छायाचित्रांचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले आहे. तरी बहुसंखयेने  पंढरपूरकरानी  व संगीत रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. 








सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिभा क्रिएशनचे अध्यक्ष ज्ञानेश बोंबलेकर , उपाध्यक्ष कन्हैया उत्पात , कार्याध्यक्ष विनया उत्पात, खजिनदार धनंजय मनमाडकर, सचिव विशाल तपकिरे तसेच वासुदेव पुजारी , संकेत कुलकर्णी , स्वप्निल जोशी , अमित उत्पात , पद्मनाभ देवडीकर , सचिन अनवलीकर आदी प्रयत्न करीत आहेत. 



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com