उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांचा आदेश.. पंढरपूर : मंदिर परिसरात नारळ फोडणेस मनाई... अवैधरित्या बॅनर लावण्यास सोलापूर शहरात मनाई

पंढरपूर LIVE 2 नोव्हेंबर 2018


पंढरपूर : मंदिर परिसरात
नारळ फोडणेस मनाई
            सोलापूर दि. 2 : - पंढरपूर शहरात 11 ते 23 नोव्हेंबर 2018 कालावधीत कार्तिकी यात्रा भरणार आहे. यात्रा कालावधीत वारकरी, भाविकांकडून नामदेव पायरी व परिसरात नारळ फोडण्याने या ठिकाणी चिखल होण्याची शक्यता आहे.  नारळ फोडणे व नारळाच्या साली मुळे या भागात कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी  पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी  विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अन्वये  मंदिर परिसरात नारळ विक्री करणे आणि नामदेव पायरी येथे नारळ फोडण्यास मनाई आदेश जारी केले आहेत. 
            हे आदेश 11 नोव्हेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजलेपासून ते 23 नोव्हेंबर 2018 रोजीच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत लागू राहतील, असेही उपविभागीय अधिकारी उपविभागीय अधिकारी  सचिन ढोले यांनी आदेशात नमूद केले आहे.
00000
अवैधरित्या बॅनर लावण्यास
सोलापूर शहरात मनाई
            सोलापूर, दि.2 :-  सोलापूर शहरात अवैधरित्या अनधिकृत लावलेल्या पोस्टर, बॅनर्समुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यासाठी सोलापूर शहर आयुक्तालल्याच्या हद्दीत खासगी इमारत, घरे व बांधकामाच्या ठिकाणी, मालमत्ताधारकाच्या परवानगीशिवाय  अवैधरित्या, अनधिकृत जाहिरातीचे पोस्टरर्स, बॅनर्स, शुभेच्छा फलक लावण्यास पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी मनाई केली आहे.
            आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 पोटकलम 2 (घ, ख) नुसार दिनांक 1 ते 30 नोव्हेंबी 2018 या कालावधीत लागू केले आहेत. या आदेशानुसार सोलापूर शहर पेालीस आयुक्तालय हद्दीत जाहिरातीचे पोस्टर, बॅनर, शुभेच्छा फलक शहरात महापालिकेने कायदेशीर ठरवून दिलेल्या ठिकाणी लावावेत. याव्यतिरिक्त इतर जागेचा वापर करु नये. सार्वजनिक रोडवर जे कोणतेही चिन्ह, साधन किंवा प्रतीरुपण कोणत्याही रस्त्याच्या एखाद्या ठिकाणाहून दिसण्याजोगे असेल आणि लक्ष विचलित करत असेल किंवा वाहतूकीस अडथळा आणत असेल असे कोणतेही चिन्ह, साधन किंवा प्रतीरुपण जाहिरातीच्या उभारण्यात मनाई करण्यात आली आहे.

00000




















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com