निशीगंधा बँक भाळवणी शाखेचे नुतनीकरण

पंढरपूर LIVE 12 नोव्हेंबर 2018



भाळवणी ता.09 सहकारी संस्था ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे. संस्था नावापुरत्या न चालवता सर्वसामान्यांच्या हितासाठी चालवणे गरजेच आहे. प्रतिकुल परस्थीतीत ही अल्पावधीत निशीगंधा बॅकेने केलेली प्रगती ही कौतुकास्पद असल्याचे गौरवउदगार माजी सहाकार मंत्री हर्षवर्धन पाटील  यांनी काढले.
भाळवणी ता.पंढरपूर येथील निशीगंधा सहकारी बॅंकच्या नूतनीकरणाचे उदघाटन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तर मनोरमा को.-आॅपरेटिव्ह बॅके सोलापूरचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्या अध्य़क्षतेखाली करण्यात आले.याप्रसंगी  राज्य सहकारी संघ मुंबईचे संचालक मंगेश पाटील, निशीगंधा बॅकेचे अध्यक्ष कल्याणराव काळे, बॅकेचे उपाध्यक्ष आऱ.बी.जाधव, सरव्यवस्थापक कैलास शिर्के आदी उपस्थित होते. याप्रसंगी श्री.पाटील बोलत होते. अध्यक्षीय निवड डाॅ.राजेंद्र जाधव यांनी केले तर त्यास अनुमोदन संचालक मंदार सोनवणे यांनी दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्रीकांत मोरे म्हणाले, सभासद, ठेवीदार हाच बॅकेचा कणा असून ही संस्था आपली आहे या भावनेतून अर्थकारणाची शिस्त ठेवून कामे केली तर शंभर कोटीचे उद्दीष्ट पुर्ण झाल्याशिवाय राहणार नाही यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेच असल्याचे सांगितले.

कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे अध्यक्ष नारायण मोरे, उपाध्यक्ष शहाजी साळुंखे,प्रतिभा पतसंस्थेचे अध्यक्ष विष्णू यलमार, सहकार शिरोमणी कारखान्य़ाचे उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, कृषीउत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भगवान चौगुले, इ.बा.मुलाणी,संचालक देवीदास सावंत, सतीश लाड,भानुदास सावंत,सुभाष पिसे, भागवत चवरे,विवेक कवडे, अॅड.क्रांती कदम, शोभाताई लाड,सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे आजी माजी संचालक, सिताराम साखर कारखान्याचे आजी माजी संचालक उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.समाधान काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार बॅकेचे उपाध्यक्ष आर.बी.जाधव यांनी मानले.


----
सर्वसामान्यांचे हीत जपणार्या या निशीगंधा बॅकेत ग्राहकांची गैरसोय होवू नये. तसेच भाळवणी भागातील आर्थिक उलाढाल पाहता याठिकाणी खातेदारांना तत्पर सेवा मिळावी या उद्देशाने या शाखेचे नुतनीकरण करण्यात आले आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याज परताव योजनेची प्रकरणे लाभार्थ्यांना तालुक्यात प्रथम याच बॅंकेने उपलब्ध करून दिली आहेत. एटीएम (मनीरिसायकल मशीन) ही बसविण्यात येणार आहे. महिला व जेष्ठ नागरीकांच्या ठेवीवर अर्धाटक्का जादा व्याज दिले जात आहे. आरटीजीएस, एनइएफटी व इपेंमेंटची सोवीधा,  लाॅकर ही उपलब्ध आहेत. बॅंकेस जिल्हा सहकार खाते, राज्य फेडरेशन, जिल्हा असोसिएशन व बॅंको अशा नामांकीत संस्थांकडून विविध पुरस्कार मिळाले आहेत. बॅकेचे 30 कोटीच्या ठेवी असून 16 कोटी रुपयांचे कर्ज वाटप असल्याचे सांगून बॅकेस आॅडीट अ वर्ग प्राप्त असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले.
-


काँग्रेसच्या काळात शेतकरी, नोकरदार, व्यापारी सर्वजन चांगल्या पध्दतीने जीवन जगत होते. आज त्याच्या उलट परीस्थीती आहे. भाजपा सरकार हे निष्क्रीय सरकार आहे. निवडणूकीत निवडून येण्यासाठी आश्वासन दिली पण ती गेल्या चार वर्षात पुर्ण करता आली नाहीत म्हणून ये तो जुमला है असे भाजपचे वरीष्ठ नेते बोलत असल्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

आज शेतकर्यांच्या मालाला हमी भाव नाही, दुधाला दर नाही , हजारो शेतकर्यांच्या भाजपाच्या काळात आत्महत्या होत असुन त्याचे गाभीर्य नसल्याचे पहायला मिळत आहे. काँग्रेसच्या काळात सरसकट कर्ज माफी देण्यात आली होती. पण यांच्या काळात फसवी कर्ज माफी करून शेतकर्यांना निकषात अडकवण्याचे काम केले आहे. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख जमा होणार आहेत. तुम्ही तत्पर रहा नाही तर बँकेत जाई पर्यत ते पैसे हे सरकार काढून घेईल असे सांगून अंधळ, बहीर अन बधीर झालेलं हे अकार्यक्षम सरकार आहे याला २०१९ मध्ये आपल्या एकीने परिवर्तन करून भाजपा सरकारच्या जाचातून मुक्त व्हा अशी टिका श्री पाटील यांनी केली.












महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com