ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचं दीर्घ आजारानं निधन

पंढरपूर LIVE 30 ऑक्टोबर 2018


मुंबईः 'शब्दप्रधान गायकी'चे पुरस्कर्ते, ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचं आज मुंबईत आजारानं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. वयपरत्वे प्रकृती खालावल्यानं त्यांना दादर येथील शुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथंच आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं संगीतातील 'देव' हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.



गेल्या काही दिवसांमध्ये यशवंत देव यांची प्रकृती अधिकच खालावली होती. अशक्तपणा आला होता. त्यामुळं १० ऑक्टोबर रोजी त्यांना शुश्रुषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तपासणीत त्यांना चिकुनगुनियाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. त्यावर उपचारही सुरू होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याचं मेडिकल बुलेटीन जारी करण्यात आलं होतं. 

'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी', 'दिवस तुझे हे फुलायचे', 'तिन्ही लोक आनंदाने', 'जीवनात ही घडी', 'स्वर आले दुरुनी', 'असेन मी नसेन मी', 'अखेरचे येतील माझ्या...' अशा शेकडो गीतांना संगीतसाज चढवून यशवंत देवांनी भावसंगीताचं विश्व समृद्ध केलं होतं. चित्रपटाबरोबरच अनेक नाटकासाठीही संगीत दिलं होतं. मराठी चित्रपटगीत, नाट्यपद, अभंग, गजल, भावगीत, समूहगीत, लोकगीत, युगुलगीत यांच्या संगीताच्या अनेक क्षेत्रांमध्ये यशवंत देव यांनी आपला अमीट ठसा उमटविला होता. 

आकाशवाणीवरही त्यांचे कार्यक्रम गाजले होते. 'भावसरगम', 'असे गीत जन्मा येते', 'शब्दप्रधान गायकी', 'रियाजाचा मंत्र' असे कार्यक्रम यशवंत देव यांनी दीर्घकाळ सादर केले. यशवंत देव यांना गदिमा पुरस्कार, गासम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं.









मान्यवरांची श्रद्धांजली

''शब्दप्रधान गायकीचे महत्त्व जपणारे आणि मराठी भावसंगीतावर ‘शतदा प्रेम’ करायला लावणारे ज्येष्ठ संगीतकार, गायक, कवी, गीतकार पं. यशवंत देव यांना भावपूर्ण श्रद्धांजली'' - विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री
''यशवंत देव यांच्या निधनाने मराठी संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजविणारे एक प्रयोगशील जेष्ठ कलावंत काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली'' - राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा




महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com