महर्षी वाल्मिकी संघ सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष पदी निलेश माने

पंढरपूर LIVE 22 ऑक्टोबर 2018


पंढरपूर प्रतिनीधी-आदिवासी जमातीचा महर्षी वाल्मिकी संघ या सामाजिक संघटनेचे सोलापूर 'युवक जिल्हाध्यक्ष' पदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती करण्यात आली. निलेश माने हे गेले तीन वर्ष शहराध्यक्ष  म्हणून या पदावर सामाजिक कार्य करत आहेत. पिडीत, शोषित, वंचितांना न्याय देण्यास अहोरात्र झटत असे. अन्याय विरुद्ध लढण्यासाठी आंदोलन असेल किंवा अनेक करणास्तर निवेदन असेल आशा अनेक कामाची दखल घेत अजून थोडी मोठी जबाबदारी म्हणून त्यांची शहराध्यक्ष वरून उच्च पदावर म्हणून सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष या पदावर त्यांची निवड केली आहे. अशी माहिती महर्षी वाल्मिकी संघ संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिद्ध पत्रका द्वारे दिली.

      एक मूर्तिकार जसा दगडाला आकार देऊन त्याची सुंदर मूर्ती तयार करतो त्या पद्धतीने माझ्या जीवनाला आकार देण्याचं काम गणेश अंकुशराव यांनी केले आहे. अठरापगड जाती व बारा बलुतेदार हेच माझे समाज म्हणून त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी काम करेल व न्याय देण्याच काम करेल. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी विश्वासाने दिली आहे व या विश्वासाला तडा नाही जाऊ देणार असे निलेश पांडुरंग माने यांनी मनोगत व्यक्त केले व आभार मानले. यावेळी उपस्थिती संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, संतोष संगीतराव, बबलू बोराळकर, रामभाऊ सुरवसे, बालाजी कोळी, संजय पगारे, सूरज कांबळे अक्षय म्हेत्रे, ओंकार सप्ताळ, ज्योतीबा कोळी, समर्थ नाळके, विशाल माने, संग्राम शिंदे, केदार परमार, विजय डोकडे, विशाल नेहतराव, नंदू साळुंखे, आदित्य राऊत, सरफराज शेख आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com