स्वेरीत लोहपुरूष सरदार पटेल यांची जयंती साजरी

पंढरपूर LIVE 31 ऑक्टोबर 2018


पंढरपूर-गोपाळपूर(ता. पंढरपूर ) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पंढरपूरमध्ये भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली.
              प्रारंभी संस्थेचे सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहपुरूष सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन उपप्राचार्य प्रा. एस.एन.कुलकर्णी यांचा हस्ते करण्यात आले. प्रा. यशपाल खेडकर यांनी लोहपुरूष सरदार पटेल यांच्या जीवनाचे महत्व सांगून त्यांच्या कार्यातील विविध पैलू उलगडताना ‘समाज कार्य असो अथवा राजकारण असो ‘राष्ट्रीय एकात्मता’ आणि ‘सरदार पटेल’ यांच्यात कधीच अंतर पडट नव्हते. म्हणून सरदार पटेल यांचे कार्य भारतवासियांनाच नव्हे तर जगातील जनतेला खूप महत्वाचे वाटते.’ असे सांगितले. यांचे यावेळी स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य , संशोधन विभागच्या अधिष्ठाता डॉ. एम.एम.पाटील, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, सिव्हील इंजिनिअरींगचे विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवारविभागप्रमुख,  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. अनुप विभूते, कॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा.व्ही.डी. जाधव, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागप्रमुख प्रा. सचिन गवळी, राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा. एस.एम.शिंदे, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख प्रा. करण पाटील, वर्कशॉप इन्चार्ज प्रा. बी.डी.गायकवाड, प्राध्यापकवर्गशिक्षकेतर कर्मचारी, एम.आर मोरे, विद्यार्थी प्रतिनिधी अक्षयकुमार कोरे  व विद्यार्थी उपस्थित होते.














महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com