पंढरपूर येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

पंढरपूर LIVE 20 ऑक्टोबर 2018




पंढरपूर, दि. 19 :-  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातंर्गत नैसर्गिक व मानवनर्मित आपत्ती व्यवस्थापनाबाबत कार्यशाळेचे आयोजन प्रांत कार्यालय, पंढरपूर येथील सांस्कृतीक भवन येथे करण्यात आले होते.




जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अतंर्गत जिल्हाप्रशासनाच्या वतीने   जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शखाली जिल्हयात 15 ते 24 ऑक्टोबर 2018 या कालावधीत गाव व तालुका पातळीवर आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. याअतंर्गत आज पंढरपूर येथे  उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार मधूसुदन बर्गे यांच्या समन्वयाने विभाग प्रमुखांची आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विशाल बडे, नायब तहसिलदार एस.पी.तिटकारे, उप-अभियंता हनुमंत बागल, आपत्ती व्यवस्थापन तज्ञ योगेश परदेशी, विवेक नायडू, लखन गायकवाड उपस्थित होते.


या कार्यशाळेत  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विशाल बडे यांनी आपत्तीचे प्रकार कोणते, आग लागल्यानंतर ती कशा पद्धतीने आटोक्यात आणावी, आपत्तीजन्य परस्थितीमध्ये शोध व बचाव कार्य कशा पद्धतीने करावेत, प्रथोमचार  कशा पध्दतीने करावेत तसेच तालुका व  गांव पातळीवर आपत्ती व्यवसस्थापनाबाबत आराखडा कशा पद्धतीने तयार करावयाचा  या बाबत मार्गदर्शन केले. तसेच आपत्ती व्यवसस्थापन तज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी मंडळअधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, संबधित कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, उमा महाविद्यालय पंढरपूर येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी मंडळ अधिकारी समिर मुजावर, तलाठी समाधान शिंदे तसेच महाविद्यालयाचे  विद्यार्थी उपस्थित होते. 


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com