संघटनामधेच यश असते ः सीमाताई परिचारक

पंढरपूर LIVE 20 ऑक्टोबर 2018


सुधाकरपंत परिचारकांच्या वाढदिनी राजयोगिनी अहिल्यादेवी मागासवर्गीय ट्रस्टच्यावतीने विविध कार्यक्रम संपन्न 

समाजकारण करीत असताना सर्वानाच संधी मिळत असते. मात्र यामधे सर्वसमावेशक नेतृत्व हे आदरणीय सुधाकरपंत परिचारक यांच्यासारख्या संस्कारशील नेत्यांमधेच घडते. याकरिंताच संघटन हे सर्वात महत्वांचे आहे. संघटनाच्या पायावरच यश हे मिळत असते. असे प्रतिपादन राजयोगिनी अहिल्यादेवी मागासवर्गीयय महीला चारीटेबल ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्षा सीमाताई परिचारक यांनी केले. 
      ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त येथील राजयोगिनी अहिल्यादेवी ट्रस्ट तसेच गोपाळपूर ग्रमपंचायत , इंदिरा गृहनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृध्दाश्रमात विविध कार्यक्रमांचे आयेाजन करण्यात आले होते. यामधे कर्तबगार महीलांचा सन्मान , वृध्दाश्रमास वैद्यकीय किट अशा वस्तू भेट देण्यात आल्या. सदरच्या कार्यक्रमांचे नियोजन हे माजी नगरसेविका कमलताई तोंडे यांनी केले होते. 
    या कार्यक्रमांच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तबगार महीलांचा देखिल यावेळी सन्मान करण्यात आला. यामधे प्रमुख्याने ग्रीस देशी अभ्यास दौरा पूर्ण केलेल्या डॉ संगीता पाटील , तसेच गोपाळकृष्ण विद्या मंदिर यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापक संस्थापिका शोभा बडवे आणि सांगोला येथील ज्येष्ठ समाजसेविका सौ. आशाताई सलगर-येळे यांची फेस्कॉम  पुणे विभागीय सदस्यपदी निवड झाल्याबददलचा सन्मान यावेळी सीमाताई परिचारक आणि नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या हस्ते सन्मानपत्र देउन गौरव करण्यात आला. 
या कार्यक्रमावेळी  गोपाळपूरच्या सरपंच विजया जगताप , सौ सुरेखा गुरव , चंदाताई तिवाडी यांच्या हस्ते वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरीकांना वैद्यकीय किट भेट देण्यात आले. 
    यावेळी नगरसेविका सुप्रिया डांगे , रेणुका घोडके , भाग्यश्री शिंदे , विवेक परदेशी , आदित्य फत्तेपूरकर , पंकज तोंडे , शितल येळे , नागनाथ रानगट , तम्माशेठ घोडके , मनसे जिल्हा संघटीका निकीता पवार , सिध्दीविनायक ट्रस्ट सांगोल्याचे ह.भ.प. इंगोले महाराज , ह.भ.प. तनपुरे महाराज संचलित मातोश्री वृध्दाश्रमाचे व्यवस्थापक श्री राक्षे . इंदिरा गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षा शफीया आतार यांच्यासह गोपाळकृष्ण विद्या मंदिरातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी , इंदिरा गृहनिर्माण संस्थेच्या सदस्या , गोपाळपूर ग्रमस्थ यावेळी उपस्थित होते. 







महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com